Dog attack : नाशिकरोडमध्ये भटक्या कुत्र्याचा दहशतवाद: पाच जण जखमी, महापालिकेची तत्काळ कारवाई

Dog attack

सद्गुरुनगर व डावखरवाडी परिसरात कुत्र्याच्या हल्ल्याने खळबळ

Dog attack – नाशिकरोडमधील सद्गुरुनगर व डावखरवाडी परिसरात एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने काल (रविवार) भीतीचं वातावरण निर्माण केलं. या कुत्र्याने पाच नागरिकांवर अचानक हल्ला Dog attack केला असून, त्या घटनेमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

कुत्र्याच्या हल्ल्यात पाच नागरिक जखमी

या हल्ल्यात खालील नागरिक जखमी झाले आहेत:

  • नितीन पंडित
  • देवांशी सोरे
  • सतीश चंदनशिवे
  • राज पिंजारी
  • अनिता गावित

सर्व जखमींवर सध्या नजीकच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. विशेषतः लहान मुले, वयोवृद्ध आणि महिलांमध्ये या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

महापालिकेची तात्काळ कारवाई: कुत्रा पकडण्यात यश

महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक किशोर गांगुर्डे आणि अमन चीनडालिया यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत कुत्र्याला सुरक्षितरीत्या जेरबंद केलं. नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत महापालिकेचे आभार मानले.

नागरिकांना दिलासा, पुन्हा शांततेचं वातावरण

महापालिकेच्या तत्परतेमुळे परिसरात पुन्हा शांतता व सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तरीसुद्धा, भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.