नाशिक रोड (प्रतिनिधी):नाशिक रेल्वे स्टेशन परिसरात “एक स्टेशन, एक उत्पाद” या उपक्रमांतर्गत विशेष प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्थानिक हस्तकला, विशेष उत्पादने आणि ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा आहे. या प्रदर्शनाद्वारे स्थानिक उत्पादकांना त्यांची उत्पादने प्रदर्शन आणि विक्रीसाठी एक उत्तम व्यासपीठ मिळणार आहे.या प्रदर्शनीत नाशिक आणि परिसरातील विविध उत्पादकांचे पारंपारिक हातमाग वस्त्र, हस्तकला उत्पादने यांसारखी विशिष्ट उत्पादने उपलब्ध आहेत. स्थानिक पारंपारिक कलेला आणि शिल्पकलेला प्रोत्साहन देण्यासाठी ही संधी महत्त्वाची ठरू शकते.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
रेल्वे मंत्रालयाच्या ‘एक स्टेशन, एक उत्पाद’ योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या या प्रदर्शनीत सहभागी होणाऱ्या उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांना राष्ट्रीय पातळीवर पोहोच देण्याची संधी मिळणार आहे. स्थानिक उत्पादक आणि हस्तकलाकारांसाठी त्यांच्या उत्पादनांना व्यापक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला आहे.रेल्वे प्रशासनाने नाशिक रेल्वे स्टेशनवर आलेल्या प्रवाशांसह स्थानिक नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.