Nashik traffic issues : पोलिस व महापालिकेच्या संयुक्त बैठकांमुळे नाशिक शहरात वाहतूक समस्या सुटणार

Clash Between Local and Outsourced Officers

Nashik police and municipal corporation meeting

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

पोलिस आणि महापालिकेची संयुक्त बैठक: नाशिकमध्ये वाहतूक समस्या Nashik traffic सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

नाशिक, २४ जानेवारी: शहरातील वाहतूक व्यवस्थेतील अडथळे दूर करण्यासाठी व अतिक्रमण रोखण्यासाठी पोलिस प्रशासन व महापालिकेची संयुक्त बैठक राजीव गांधी भवन येथे पार पडली. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून, रामकुंड व गोदाघाट परिसरातील बेकायदेशीर टपऱ्या हटविणे, तसेच २७ ठिकाणी नवीन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे यावर भर देण्यात आला.

बैठकीत ३० ठिकाणी अतिरिक्त पार्किंगची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. तसेच शहरातील गर्दीच्या Nashik traffic ३४ ठिकाणी रस्त्यावर व दुकानांसमोर असलेले बेकायदा अतिक्रमण हटविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले.

वाहतूक वार्डनचा समावेश:
वाहतूक पोलिसांची संख्या अपुरी असल्यामुळे ट्रॅफिक वार्डनना सहाय्यक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी याबाबत महत्त्व सांगून त्यांच्या योगदानावर भर दिला.

वाहतुकीस अडथळा ठरणारे सर्कल सुधारण्याचे नियोजन:
मायको सर्कल, सारडा सर्कल यांसारख्या चौकांचा आकार मोठा असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. या सर्कलचा आकार कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी सांगितले.

गॅरेजसमोरील वाहने हटविण्यासाठी अल्टिमेटम:
सारडा सर्कल, मुंबई नाका व आडगाव नाका परिसरातील गॅरेजमुळे वाहतूक अडथळे Nashik traffic निर्माण होत असल्याने सात दिवसांत नादुरुस्त वाहने हटवण्याचे आदेश दिले आहेत.

स्मार्ट सिटीचा सहभाग:
वाहतूक सुधारण्यासाठी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी सहकार्याची ग्वाही दिली आहे. बंद पडलेली सिग्नल यंत्रणा पूर्ववत सुरू करणे आणि बस स्टॉप स्थलांतरित करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

वाहतुकीसाठी तक्रारींचे WhatsApp हेल्पलाइन:
वाहतुकीबाबत नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी ९९२३३२३३११ या WhatsApp क्रमांकावर संपर्क साधता येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

तयार आहे शहर सुशोभित व सुरळीत वाहतुकीसाठी!
या निर्णयांमुळे नाशिकमधील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा आहे.