कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शस्त्र व जमावबंदी आदेश लागू महत्त्वपूर्ण निर्णय
नाशिक: जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 अंतर्गत कलम 37 (1) (3) अन्वये शस्त्र (weapon ban)आणि जमावबंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश 1 फेब्रुवारी 2025 रोजी मध्यरात्रीपासून 15 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
शस्त्र आणि जमावबंदी आदेशाचे स्वरूप
- कुठे लागू?
- संपूर्ण नाशिक ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस उपायुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून).
- कोणत्या कायद्यांतर्गत?
- मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अंतर्गत.
- किती कालावधीसाठी?
- 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2025 दरम्यान.
या आदेशात कोणाला सूट आहे?
सदर आदेश लग्नसमारंभ, मिरवणुका, आठवडे बाजार आणि प्रेतयात्रांना लागू होणार नाही. तसेच पोलिस अधिकारी, शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि योग्य परवानगी घेतलेल्या सभा व मिरवणुकांस या आदेशातून वगळण्यात आले आहे.
का लावला शस्त्रबंदी (Weapon Ban)आदेश?
नाशिक जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. संभाव्य गोंधळ, असुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेच्या अडचणी टाळण्यासाठी प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे, असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.