नाशिक | अ‍ॅटोरिक्षात प्रवासादरम्यान महिलेचा विनयभंग; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Nashik | Woman molested while travelling in auto-rickshaw; Case registered against driver

नाशिक – अ‍ॅटोरिक्षात प्रवास करत असताना एका महिलेचा रिक्षाचालकाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस संशयित चालकाचा शोध घेत आहेत.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

सिडको परिसरातील पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवार (दि. २२ जून) रोजी रात्री ती मेनरोड भागात जात असताना स्टेट बँक चौकातून एका अज्ञात रिक्षामधून प्रवास करत होती. प्रवासादरम्यान चालकाने तिच्याशी अश्लील वर्तन केले. सुरुवातीला रात्रीची वेळ असल्याने पीडितेने दुर्लक्ष केले.

मात्र, यशवंत व्यायामशाळा परिसरात रिक्षा थांबवून संशयित चालकाने पुन्हा तिचा विनयभंग केला. यानंतर महिलेने धाडसाने पुढे येत तक्रार दाखल केली. सध्या हवालदार सोनवणे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.