नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थी सुरक्षा बाबत कार्यशाळा संपन्न.

WhatsApp Image 2024 08 30 at 17.21.03 84490f10

दिनांक ३०ऑगस्ट २०२४

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक महानगरपालिका, नाशिक.
शिक्षण विभाग.

प्रेस नोट

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थी सुरक्षा बाबत कार्यशाळा संपन्न.

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने नाशिक महानगरपालिकेच्या ९२ प्राथमिक व १३ माध्यमिक शाळांतील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक,शिक्षक, , कामाठी,अंशकालीन कर्मचारी, समग्र शिक्षा अभियान चे सर्व कर्मचारी यांची एकत्रित कार्यशाळा आज दिनांक ३० ऑगस्ट २४ रोजी नाशिक महानगरपालिका शिक्षणाधिकारी बी टी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कार्यशाळेची सुरुवात ईशस्त्वन आणि राज्यगिताने झाली. कार्यशाळेचे प्रास्ताविक बाळासाहेब कडलग यांनी केले.
श्री बी टी पाटील यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन करताना महाभारतातील अनेक उदाहरणं देत शिक्षकांनी विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.दररोज आपण शाळेत असताना पालक, विद्यार्थी,नागरिक सहकारी यांचेशी चांगले वर्तन करून एक आदर्श सहकारी ,शिक्षक शिक्षिका असल्याचे उदाहरण निर्माण करावे.तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मरण करून त्यांनी घालून दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात यावे.आपल्याला दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी नियोजन करावे.आपल्या कमावर श्रद्धा ठेवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास बरोबर त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत आपण सतर्क राहावे आणि शालेय वेळेत सर्व मुले मुली आपल्या जबाबदारीवर असतात त्यामुळे त्यांची काळजी घेणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे.य वेळी शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय यांचे विश्लेषण करून त्यातील तरतुदींचे काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी त्या बाबत कोणतीही तडजोड होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा विविध सूचना केल्या.
अनेक शाळांमध्ये चांगले वातावरण तयार झाले आहे.मात्र अजून काही शाळांमध्ये चांगले वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन गुण्यागोविंदाने काम करावे. सोशल मीडियाचा चांगल्या कामासाठी वापर करून विद्यार्थी हितासाठी काय करता येईल हे पाहावे.आपण एका जबाबदार विभगाचे घटक असून आपल्या माध्यमातून चांगले काम व्हावे हीच अपेक्षा आहे.शिक्षक संघटना समन्वय समिती,इतर शिक्षक संघटना यांनी शैक्षणिक,सामाजिक वातावरण चांगले राहावे यासाठी एकत्रित येऊन गुण्यागोविंदाने काम करणे अपेक्षित आहे. सर्व शाळेमध्ये सखी सावित्री समिती,विशाखा समिती,सुरक्षा समितीची रचना अद्यावत करून नियमित बैठका घेतल्या जाव्यात.१०९८ चाइल्ड हेल्पलाईन नंबर दर्शनी भागात लावावे.बालकांचे हक्क आणि सरक्षितता या बाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत त्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षे बाबत शासन निर्णय दिनांक ०७ जुलै १०१५,०५ मे २०१७,१० मार्च २०२२, २१ ऑगस्ट २०२४ इत्यादी शासन निर्णयाचे या वेळी अवलोकन करण्यात आले. तंबाखू गुटखा नशिली पदार्थ यांची विक्री शालेय परिसरात होणार नाही याची काळजी घ्यावी.ज्या काही थोडेफार विद्यार्थ्यांना वाईट सवयी आहेत त्यांचे समुपदेशन करावे.मुख्याध्यापक यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आढावा घ्यावा.दप्तर मुक्त शनिवार,शालेय वेळेत मोबाईल बंदी,तसेच सायंकाळी ७ ते ९ या वेळेत पालक, नागरिक,विद्यार्थी यांनी मोबाईल वापरू नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे.महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांची तपासणी सुरू झाली असून सर्वांनी सर्व बाबतीत सतर्क राहावे.
तक्रार पेटी आठवड्यातील एक निश्चित केलेल्या दिवशी उघडण्यात यावी असे या कार्यशाळेत सांगण्यात आले.

Leave a Reply