नाशिक शहरात गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. वालदेवी नदीत गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समजते. या घटनेत पाथर्डी रोडवरील समर्थनगर येथील रहिवासी स्वयंम भैया मोरे (२४) आणि ओमकार चंद्रकांत गाडे (२३) या दोन तरुणांचा समावेश आहे.या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली, मात्र दोघांना वाचवण्यात यश आले नाही. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.