६९ वर्षांची परंपरा जपत नाशिकच्या रामलीलेची रंगीत तालीम सुरू

59 warshanchi parpara

नाशिक रोड, प्रतिनिधी

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक-पुणे मार्गावरील गांधीनगर येथील ऐतिहासिक रामलीला यंदा ६९ व्या वर्षात पदार्पण करत असून नव्या जोमात सादर होणार आहे. त्यासाठी रामलीलेच्या रंगीत तालमीचा शुभारंभ रामलीला समितीचे महासचिव कपिलदेव शर्मा, दिग्दर्शक प्रदीप भुजबळ, सह दिग्दर्शक संजय लोळगे यांच्या हस्ते झाला. पदाधिकारी संतोष कट्यारे, सुनील मोदीयानी, भरत राव, रोहित परदेशी, ओम जाधव, साहिल शर्मा, सुनील साधवानी, सचिन दलाल, गुड्डू परदेशी, गुरू त्रिखा, प्रथमेश पाडवी उपस्थित होते. रामलीला समितीचे सचिव कपिल शर्मा म्हणाले की, रामलीलेत यंदा अनेक आकर्षक व नाविन्यपूर्ण बदल करण्यात आले असून अधिक उत्साहपूर्ण वातावरणात रामलीला सादरीकरण केले जाणार आहे. संजय लोळगे यांनी सर्व कलाकारांचे योगदान यंदाही कायम राहील असा विश्वास व्यक्त केला. सर्व कलावंत, तंत्रज्ञ यांनी कसून सराव करून रामलीला यशस्वी करण्याचे आवाहन दिग्दर्शक प्रदीप भुजबळ यांनी केले. या रामलिलेत सर्व जाती-धर्माचे कलाकार योगदान देत असतात. दहा दिवस रामलिलेत विविध प्रसंग पाहण्यासाठी आबाल वृध्दांची गर्दी होत असते. दस-याला रावणदहण केले जाते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी केली जाते. या प्रसंगी पन्नास हजारावर रामभक्त उपस्थित असतात.

Leave a Reply