Massive Financial Blow NDCC Bank : नाशिक जिल्हा बँकेची आर्थिक अडचण : 2200 कोटींचे थकीत कर्ज, द्वारका इमारतीच्या विक्रीचा प्रस्ताव

NDCC Bank

शेतकऱ्यांना दिलासा, पण बँकेची अडचण वाढली

NDCC Bank : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (NDCC Bank) सुमारे २,२०० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुढील तीन महिने सक्तीच्या कायदेशीर वसुलीवर स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे बँकेसमोर आर्थिक अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

द्वारका येथील इमारत विक्रीची हालचाल सुरू

या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बँकेने द्वारका येथील वापरात नसलेली नवी इमारत विक्रीस काढण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यासंदर्भात माहिती देताना बँकेचे मुख्य प्रशासक प्रतापसिंग चव्हाण यांनी सांगितले की, “सरकारचे सचिव याबाबत अंतिम निर्णय घेतील. व्हॅल्युएशनसाठी व्हॅल्युअर नियुक्त केले जाणार आहेत.

२०१७ पर्यंत या इमारतीत कामकाज

सन २००२ ते २००७ या काळात द्वारका येथे बँकेसाठी नवी इमारत बांधण्यात आली होती. २०१७ पर्यंत या इमारतीत बँकेचे कामकाज सुरू होते, मात्र नंतर बँक नवीन जागेत स्थलांतरित झाली. त्यानंतर ही इमारत वापरात राहिली नाही. सध्या सीबीएस येथील जुन्या इमारतीतूनच बँकेचे कामकाज सुरू आहे.

बँकेला आर्थिक दिलासा मिळवण्याचे प्रयत्न

शेतकऱ्यांवर आर्थिक ताण नको म्हणून कायदेशीर वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे, पण त्यामुळे बँकेच्या व्यवहारात अडथळे निर्माण झाले आहेत. बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असून, बँकेच्या खात्यात निधी जमा करून व्यवहार सुरळीत करण्याचे नियोजन सुरू आहे.