NEET Result Tragedy | NEET मध्ये कमी गुण मिळाल्याने वडिलांच्या मारहाणीने 17 वर्षीय मुलीचा मृत्यू

NEET Result Tragedy | 17-year-old girl dies after being beaten by her father for getting low marks in NEET

सांगली (NEET Failure Death Case): NEET Result Tragedy सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. NEET परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने एका वडिलांनी स्वत:च्या मुलीला अमानुष मारहाण केली, ज्यामुळे तिचा उपचाराअभावी मृत्यू झाला.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

NEET Result Tragedy – मृत विद्यार्थिनी : साधना धोंडीराम भोसले (वय १७)

बारावीमध्ये शिक्षण घेणारी साधना डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून NEET साठी अभ्यास करत होती. मात्र परीक्षेतील अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे तिचे वडील धोंडीराम भोसले (मुख्याध्यापक) यांनी तिला लाकडी जात्याच्या खुट्याने बेदम मारहाण केली.

प्रत्युत्तर ठरलं प्राणघातक!

साधनाने वडिलांना शांत करताना म्हटलं –
“पप्पा, तुम्ही कधी कलेक्टर झाला? तुमचेही मार्क कमीच होते ना!”
या वाक्यानंतर संतप्त वडिलांनी क्रूरपणे मारहाण केली. ही मारहाण इतकी गंभीर होती की, साधना बेशुद्ध झाली.

उपचाराआधीच मृत्यू

घटनेच्या दुसऱ्या दिवशी वडील ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यासाठी शाळेत गेले. घरी परत आल्यावर साधना बेशुद्ध अवस्थेत आढळली. रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

पोलिस कारवाई व अटकेची कार्यवाही

साधनाच्या आई प्रीती भोसले यांच्या तक्रारीवरून आटपाडी पोलिसांनी आरोपी वडील धोंडीराम भोसले यांना अटक केली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.

शिक्षणात अपयश, पण पालकत्वात का?

ही घटना केवळ कौटुंबिक हिंसाचाराचे उदाहरण नाही, तर मुलांवर टाकल्या जाणाऱ्या शैक्षणिक दबावाचाही भीषण परिणाम आहे. अपयश स्वीकारण्याची मानसिकता आणि संवादाची गरज समाजात अधोरेखित करणारी ही घटना आहे.