Nashik News नाशिक सीबीएसचे जुने बसस्थानक इतिहासजमा; नव्या बांधकामाची सुरुवात

news/v/6304/old-cbs-started-to-demolish-today

नाशिकचे सीबीएस (मध्यवर्ती बस स्थानक) ज्याला शहरातील सर्व प्रवाशांसाठी एक केंद्रित स्थान मानले जात होते, आजच्या घडीला त्याच्या जुन्या इमारतीचा शेवट झाला आहे. सुमारे 100 वर्षे जुनी ही इमारत, जी अनेक वेळा दुरुस्ती व रंगरंगोटी करून टिकवली जात होती, अखेर मोडकळीस आली आहे. या बस स्थानकाचे उद्घाटन तत्कालीन मुंबईचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते झाले होते, असे सांगितले जाते. इमारत अत्यंत जुनी झाल्यामुळे काही भाग पडू लागले होते, ज्यामुळे ती सुरक्षित नव्हती. यामुळे स्थानकाच्या नव्या पुनर्बाधणीची योजना आखण्यात आली.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

आ. देवयानी फरांदे यांनी या महत्त्वाच्या वास्तूची दुरुस्ती व पुनर्बाधणी करण्यासाठी परिवहन महामंडळ आणि शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर, सुमारे 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या निधीच्या मदतीने नव्या बसस्थानकाचे काम हाती घेण्यात आले. काही दिवसांपूर्वीच या नव्या वास्तूच्या बांधकामाचा ठराव मंजूर झाला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. या वास्तू पाडण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. बसस्थानकाच्या परिसरातील काही दुकाने इतरत्र हलवण्यात आली आहेत, तर काही टपऱ्या रस्त्याच्या दिशेने हलवण्यात आल्या आहेत.

नव्या बस स्थानकाचे स्वरूप

या नव्या बस स्थानकाच्या बांधकामात अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत. दोन मजली इमारत उभी राहणार असून तळमजल्यावर 950 चौरस मीटरचे बांधकाम केले जाईल, तर पहिल्या मजल्यावर 590 चौरस मीटरचे काम होईल. या नव्या इमारतीसाठी सांडपाण्याची नवीन व्यवस्था, फायर फायटिंग सुविधा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यांसारख्या प्रणाली असतील. बसस्थानकाच्या परिसरातील 4400 चौरस मीटरचे क्षेत्र काँक्रिटीकरण केले जाणार आहे आणि पेवर ब्लॉक लावण्यात येतील.