निफाड येथे गोदावरी पाणी वाढल्याने रस्ता बंद

निफाड येथे गोदावरी पाणी वाढल्याने रस्ता बंद

नांदुर मध्यमेश्वर, खेडे- उगाव,रौलस पिंपरी येथील वाहतूक बंद

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

चांदोरी येथे गोदावरीची पातळी स्थिर

वाढत्या पावसामुळे पोलीस बंदोबस्त तैनात

व्हॉइस : निफाड येथे विविध ठिकाणी त्रिवेणी संगम असल्यामुळे वडाळी कादवा गोदावरी यांचे पाणी वाढल्याने नांदुरी, चांदोरी रस्ता व अतिशय प्राचीन महादेव मंदिर याकडे जाण्याचा रस्ता सध्या बंद आहे. तसेच गावात विविध ठिकाणी दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त विविध ठिकाणी खिचडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. श्रावणी सोमवार निमित्त संगमेश्वर मंदिर, उमामेश्वर मंदिररामध्ये भाविकांची खूपच मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. पानवेली अडकल्याने नांदूर मध्यमेश्वर च्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पाण्याच्या वाढत्या विसर्गामुळे व संततधार पावसामुळे निफाड तालुक्यातील नांदुर मध्यमेश्वर, खेडे- उगाव, रौलस पिंपरी येथील पुल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद केले आहेत. चांदोरी येथे गोदावरीची पातळी स्थिर असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Reply