NMC : Nashik Mahanagar Palika Recruitment 2025 : नाशिक महानगरपालिकेत १४० पदांची भरती; शासनाची मंजुरी मिळाली !

Clash Between Local and Outsourced Officers

NMC Recruitment 2025 Apply Online

नाशिक महानगरपालिकेच्या NMC सुधारित आकृतिबंधाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असतानाच, शासनाने तांत्रिक संवर्गातील १४० पदांच्या भरतीस मंजुरी दिली आहे. आयुक्त मनीषा खत्री यांच्या प्रयत्नांमुळे शासनाने ३५% आस्थापना खर्चाची अट शिथिल केली आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

महापालिकेत १४० पदांवर नोकरभरती सुरू

महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टानुसार ७,०८२ मंजूर पदांपैकी ३,००० हून अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासनावर मोठा परिणाम होत आहे. महापालिकेच्या ‘ब’ वर्ग दर्जाच्या तुलनेत आस्थापना मात्र ‘क’ वर्गाची असल्याने सुधारित आकृतिबंध प्रस्ताव २०१८ पासून रखडला आहे.

NMC भरती प्रक्रियेच्या अंमलबजावणीला गती

महानगरपालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाचे उपसचिव अजिंक्य बगाडे यांनी फेब्रुवारी ४, २०२५ रोजी अधिकृत मंजुरी पत्र दिले. त्यामुळे या भरती प्रक्रियेला गती मिळणार आहे.

महत्वाचे मुद्दे:

  • १४० पदांची नोकरभरती तांत्रिक संवर्गासाठी
  • आस्थापना खर्चाची अट शिथिल
  • महानगरपालिकेच्या रिक्त ३,००० पदांवर विपरित परिणाम
  • नऊ हजार नवीन पदांसाठी दोन वेळा शासनास विनंतीपत्रे
  • आगामी सिंहस्थपूर्वी मोठ्या प्रमाणावर भरती होण्याची शक्यता

पूर्वीच्या भरती प्रक्रियांचे काय झाले?

कोव्हिड काळात वैद्यकीय, आरोग्य, अग्निशमन विभागात ७०६ पदे मंजूर झाली होती, मात्र मुदत संपल्याने ती भरती रखडली. टीसीएस कंपनीसोबत करार होऊनही प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे या वेळेस महापालिका प्रशासन भरतीसाठी अधिक दक्ष आहे.

महापालिका प्रशासनाची पुढील दिशा

महापालिकेच्या सुधारित आकृतिबंधास मंजुरी मिळवण्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. पहिल्या टप्प्यात १४० पदे भरली जातील, तर उर्वरित पदांसाठी प्रशासनाने हालचाली सुरू ठेवल्या आहेत.

“महापालिकेचा आकृतिबंध मंजूर करण्यासाठी शासनाकड पाठपुरावा सुरू आहे. पहिल्या टप्प्यात शासनाने १४० पदांची भरती मंजूर केली असून उर्वरित पदांसाठी प्रक्रिया सुरू आहे.”

  • मनीषा खत्री, आयुक्त, नाशिक महानगरपालिका

Nashik Mahanagar Palika Recruitment 2025 Apply Online – अर्ज कसा कराल?

महापालिकेच्या तांत्रिक संवर्गातील भरतीसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. इच्छुक उमेदवारांनी महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर (www.nmp.gov.in) नियमित तपासणी करावी.

He Pan Wacha : “आयकर विभाग भरती 2024: कॅन्टीन अटेंडंट पदासाठी अर्ज करा”