
केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशांनुसार नाशिक महानगरपालिका,नाशिकच्या वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.त्या अनुषंगाने शहरातील विविध ठिकाणी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रचार प्रसारा व पर्यावरण पूरक जनजागृतीपर फलक मनपाच्या वतीने लावण्यात आले आहे.या फलकावरील सूचना मजकूरात मूर्तीच्या मागे हिरव्या रंगाचा ठिपका द्यावा असे नमूद केले असले तरी ते बंधनकारक नसल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे मनपाचे पर्यावरण उपयुक्त अजित निकत यांनी कळविले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.