नाशिक: पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नायलॉन मांजाच्या Nylon Manja वापर, विक्री व साठ्यावर बंदी घालूनही काही दुकानदारांनी नियमाला हरताळ फासत विक्री सुरू ठेवली आहे. धुमाळ पॉइंट येथील मीना कलेक्शन या दुकानात नायलॉन मांजाचा मोठा साठा असल्याची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी धाड टाकली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
कारवाईत सुमारे ३७ हजार ५०० रुपयांच्या ३७ गाठी नायलॉन मांजाचा Nylon Manja साठा जप्त करण्यात आला आहे. बंदी असूनही नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांना रोखण्यासाठी प्रशासनाने ही बंदी लागू केली आहे. मात्र, काही जण जीवघेण्या मांजाचा साठा करून निष्काळजीपणाचे दर्शन घडवत आहेत. यामुळे नागरिकांनी देखील सजग राहून पोलिसांना अशा प्रकारांबद्दल माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे