देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूल मध्ये दामिनींचेसायबर क्राईम, स्वरक्षण धडे

WhatsApp Image 2024 09 05 at 12.50.48 982018e7

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

निर्भया पथक व दामिनी पथक यांनी आज देवळाली कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हायस्कूल शाळेला भेट दिली. गुड टच बॅड टच तसेच सायबर क्राईम बाबत मुलींना समुपदेशन केले.सायबर क्राईम बाबत जागृती तसेच स्वसंरक्षणाचे धडे मिळाल्याने विद्यार्थीनींचा आत्मविश्वास वाढला आहे.
निर्भया पथकामध्ये , रेखा साळे व अनुराधा दिघे यांनी मुलांना गुड टच बॅड टच तसेच सायबर क्राईम, हिरव्या पथक, बदामिनी पथक तसेच ११२ क्रमांका बद्दल मार्गदर्शन केले. संपत बोराडे, रेखा साळे, तसेच दामिनी पथकातील व सोनाली यांनी यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले.
या पथकाने स्वसंरक्षणाची माहिती देतानाच संकटप्रसंगी स्वतःचे संरक्षण गुंडांपासून कसे करावे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. दामिनी व निर्भया पथकाचे कार्य, महत्व, योगदान या बाबत माहिती दिली. सायबर क्राईमचे प्रमाण वाढले असून सामान्य नागरिक, युवा वर्ग त्याला बळी पडत आहे. सोशल मिडीया, इंटरनेट, बॅंकींग, मोबाईलचा गैरवापर करून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. सामान्य नागरिकांना खोट्या गुन्ह्यात सायबर क्राईमव्दारे अडकवले जात आहे. त्यांना ब्लॅकमेलही केले जाते. त्यामुळे सायबर क्राईमपासून काय दक्षता घ्यावी याची माहिती या पथकाने दिली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री खैरनार यांनी पथकाचे स्वागत केले.यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply