महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त विधिमंडळाच्या मध्य सभागृहात राष्ट्रपती मूर्मु यांच्या हस्ते

Untitled design 2023 07 07T152743.196

महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त विधिमंडळाच्या मध्य सभागृहात राष्ट्रपती मूर्मु यांच्या हस्ते
वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व. ‘ या ग्रंथाचे प्रकाशन आणि उत्कृष्ट ‘संसद पटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार वितरण करण्यात आले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी.पी राधाकृष्णन, विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,विधान परिषद उपसभापती डॉ.नीलिमा गोऱ्हे,
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्यमंत्री
चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उपस्थित होते..

यावेळी राष्ट्रपती मूर्मू यांनी आपल्या भाषणात म्हणाल्या की
स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. वीर माता जिजाऊ यांची धरती असलेल्या आणि स्त्री शिक्षणातील सुरुवात करणारे महात्मा ज्योतिराव फुले,सावित्री फुले, संसदीय लोकशाहीवर मार्गक्रमण करत असलेल्या भारताला घटना देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान विभूतींचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सव साजरा होत असल्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व जनतेचे लोकप्रतिनिधींचे अभिनंदन. विधान परिषदेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत अनेक दिशादर्शक नियम, कायदे यांची निर्मिती केली आहे.
यामध्ये वी.स.पांगे यांनी दिलेल्या रोजगार हमी योजना या लोकोपयुक्त कायदा हीच या विधिमंडळाची देण आहे. विविध महत्वपूर्ण निर्णय आणि कायदे करण्यासोबतच लोकांच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे विधिमंडळ काम करत आहे. या माध्यमातून वरिष्ठ सभागृहाची भूमिका यशस्वीपणे बजावत देशाच्या संसदीय प्रणालीत महाराष्ट्र विधिमंडळाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे असे सांगून विधान परिषदेच्या शतकपूर्तीच्या वाटचालीचा आढावा घेणारा संदर्भ ग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल आणि या ग्रंथात तात्कालीन बॉम्बे विधान परिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती श्रीमती जेठी सिपाहीमलानी यांच्यावर सविस्तर माहिती देणारे प्रकरण ठेवल्याबद्दल राष्ट्रपती मूर्मु
यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply