नाशिक , ता. ६ : श्रीराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंचवटी नाशिक आणि पंचक्रोशीत यंदाचा गणेश उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी पुढाकार घेतला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

याचाच एक भाग म्हणून ‘राष्ट्रीय हरित सेना‘ अंतर्गत शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेत शिक्षक वृंद ,कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी उत्साहाने सहभागी होऊन शाडू मातीच्या माध्यमातून गणेश मूर्ती बनविल्या
याबाबत सकाळ सत्राचे प्रमुख श्री. सुरसे सर म्हणाले, “गणेशोत्सव कालावधीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, विषारी रंग, प्लास्टिक आणि थर्मोकोलची सजावट इत्यादी गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. हे सर्व पाण्यात न विरघळणारे आणि विषारी पदार्थ आहेत. या मुर्त्यांचे नद्या, तलाव, विहिरी यांमध्ये विसर्जन केल्यानंतर त्यांचे अवशेष पाण्यात न विरघळता तसेच राहतात परिणामी जलप्रदूषण होऊन पाण्यातील अनेक जीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. त्यामुळे पर्यावरण पूरक मूर्तीचा वापर, पर्यावरणपूरक सजावट, निर्माल्य संकलन करून खत निर्मिती इत्यादी बाबत जनजागृती करून सणांच्या काळात होणारे जलप्रदूषण कमी होवू शकते.”
या उपक्रमास सकाळ सत्राचे प्रमुख श्री. सुरसे सर व जेष्ठ शिक्षक श्री. शिसोदे सर * यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले व त्यांचे कौतुक पण केले.हा उपक्रम श्री. बेंडकोळी सर व श्रीमती कदम मॅडम यांनी राबविला.