पिंक ई-रिक्षा अर्जासाठी 10 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Pink E-Rickshaw Scheme: A New Opportunity for Women Empowerment in Nashik

नाशिक: राज्यातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने, महिला व बालविकास विभागाने पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजनेचा प्रारंभ केला आहे. या योजनेंतर्गत नाशिक शहरातील 700 महिलांना ई-रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख आता 10 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जाहीर केले आहे. याबाबतची माहिती महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने यांनी दिली.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

या योजनेचा उद्देश महिलांना सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देणे आणि त्यांना स्वावलंबी बनविणे आहे. इच्छुक महिलांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्जाचे नमुने व आवश्यक कागदपत्रांची यादी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नाशिक तसेच www.nashik.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

योजना लाभासाठी पात्रता व अटी-शर्ती:

अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.

वय 20 ते 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी असावे.

विधवा, घटस्फोटीत, अनाथ, दारिद्र्यरेषेखालील महिलांना प्राधान्य.

ई-रिक्षा किंमतीच्या 70% रक्कम बँक कर्ज, 20% राज्य शासन आणि 10% रक्कम लाभार्थीने स्वतः भरावयाची.

कर्जाची परतफेड 5 वर्षात करावी.

एकदा मिळालेल्या योजनेचा लाभ पुन्हा घेता येणार नाही.

इच्छुक महिलांनी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर असल्यामुळे संबंधितांनी आपले अर्ज वेळेत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply