Political Controversy : नाशिक-पुणे हाय स्पीड रेल्वे प्रकल्पावर राजकीय वाद!

Political Controversy

मार्ग बदलण्याच्या हालचालींना सर्वपक्षीय विरोध

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Political Controversy : नाशिक-पुणे हाय स्पीड रेल्वे प्रकल्पावर अचानक राजकीय अडथळा निर्माण झाला आहे. सत्ताधारी पक्षाकडून मार्ग बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याने हा मुद्दा नव्या वादाला तोंड फोडत आहे.

Political Controversy : नाशिक-पुणे मार्ग शिर्डी-नगरमार्गे नेण्याचा प्रयत्न?

1. काही नेत्यांनी हा रेल्वे मार्ग शिर्डी व नगरमार्गे नेण्याचा आग्रह धरल्याचे बोलले जात आहे.
2. या बदलामुळे मूळ प्रकल्पाचा उद्देशच हरवेल, असा आरोप होत आहे.
3. मूळ नियोजनानुसार मार्ग राहावा यासाठी सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले आहेत.

Political Controversy : आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकाराने एकजूट

1.आमदार सत्यजित तांबे यांनी या मुद्द्यावर मागील काही दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केला.
2.कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अमोल खताळ यांच्यासह अन्य नेत्यांची बैठक झाली.
3.खासदार राजाभाऊ वाजे, भाऊसाहेब वाकचौरे, अमोल कोल्हे, बाबाजी काळे, शरद सोनवणे यांनीही ऑनलाईन सहभाग घेतला.

मार्ग बदलल्यास वेळ आणि अंतर वाढणार

जर नाशिक-पुणे हाय स्पीड रेल्वे मार्ग बदलला, तर प्रवासाचे अंतर तब्बल ७०-८० किलोमीटरने वाढेल आणि वेळ दीड तासाने अधिक लागेल.
‘GMRT’ तंत्रज्ञानाद्वारे बोगदे आणि अन्य तांत्रिक उपाय शक्य असल्याने मार्ग बदलण्याची गरज नाही, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा होणार

या मुद्द्यावर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक होणार आहे.
जर सरकारने मूळ मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला, तर संघर्ष करण्याची तयारी असल्याचा इशारा नेत्यांनी दिला आहे.