🌹श्री स्वामी समर्थ 🌹
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राहु काळात, का करू नये शुभ आणि नवीन कार्याची सुरुवात?
मागे एकदा समुहात आपण राहू आणि केतू यांची माहिती दिली होती. आज राहू बद्दल आणखी थोडी माहिती जाणून घेऊयात. चुकून जर राहू काळात सुरुवात झालीच असेल, तर काय करावे? प्रत्येक वारी कुठच्या वेळेत असतो राहू काल? ज्योतिष मध्ये नवग्रहांना राशी, नक्षत्रांचे स्वामित्व दिले आहे, मात्र वार केवळ सात ग्रहांनाच दिले आहेत ते रवी पासून शनि पर्यंत. आपण रविवार ऐकले असेल पण राहुवार कधी एकला नसेल, शनिवार ऐकला असेल पण केतुवार ऐकला नसेल. मग राहू-केतू या दोन ग्रहांना वार का नाही दिले? या दोन ग्रहांचा काही वेळ नसतो का? याचं ज्योतिष मध्ये काय महत्व आहे? ज्योतिष मध्ये राहू आणि केतू यांना छाया ग्रह मानले आहे, म्हणजे वास्तवा मध्ये इतर ग्रहां प्रमाणे यांना आकाशीय पिंढ नाही, हे छाया ग्रह आहेत. म्हणून यांना वास्तविक शरीर नसल्याने यांना वास्तविक वार पण नाही दिला, मग यांचा काही काळ नसतो का? हो राहुला तर काळ दिला आहे, प्रत्त्येक दिवशी एक निच्छित काळ राहुला दिला आहे. पण केतुला कूठचाही काळ दिलेला नाही. कारण केतू मोक्षाचा ग्रह मानला आहे, मुक्तीचा ग्रह सांगितला आहे हा. काळाच्या सीमेच्या परेग्रह आहे, हा काळ जो आहे जेथे जाऊन पूर्णतः काळ थांबला जातो, म्हणून केतुला मोक्षाचा ग्रह मानला आहे, असो. *
राहुकाळ प्रत्येक वारी राहुचा काळ वाटून दिला आहे, प्रत्येक दिवशी दीड तासाचा काळ राहूसाठी निच्छित केलेला आहे, जो वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या वेळेत येतो, याला राहू काळ म्हणतात. राहू काळ चांगला काळ मानला जात नाही, अशी मान्यता आहे की, या काळात सुरू केलेले कोणतेही नवीन काम, कुठलीही नवीन यात्रा, नवीन दुकान, नवीन घर, नवीन व्यवसाय असेल तर शुभ फळ देत नाही. ते काम कधीच पूर्ण होत नाही, जे राहू काळात केले जाते.*राहू काळ कोणत्या वारी? केव्हा असतो?*
१) रविवारी संध्याकाळी ४:३० पासून संध्याकाळी ६:०० पर्यंत.
२) सोमवारी सकाळी ०७:३० पासून सकाळी ०९:०० पर्यंत.
३) मंगळवारी दुपारी ०३:०० पासून संध्याकाळी ०४:३० पर्यंत.
४) बुधवारी दुपारी १२:०० पासून दुपारी ०१:३० पर्यंत.
५) गुरुवारी दुपारी ०१: ३० पासून दुपारी ०३:०० पर्यंत.
६) शुक्रवारी सकाळी १०:३० पासून दुपारी १२:०० पर्यंत.
७) शनिवारी सकाळी ०९:०० पासून सकाळी १०:३० पर्यंत. अश्या प्रकारे वेगवेगळ्या वेळेत राहुकाळ दिला आहे. या काळाचा ध्यानपूर्वक लक्ष ठेवा खास करून, ज्यांची राहूची महादशा चालू आहे आणि त्यांचा राहू कुंडलीत बिघडलेला असेल. तर या काळात कुठच्याही परिस्थितीत उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये ॲडमिट होऊ नये किंवा कूठच्या कोर्ट केसच्या सुनावणीसाठी न्यायालयात जाऊ नये, अन्यथा अश्या स्थितीत मोठी समस्या निर्माण होईल. खूप कष्ट सहन करावे लागतील.
राहू काळ, एवढा वाईट काळ का मानला आहे?
कारण राहुला ज्योतिषा मध्ये उत्पातचा ग्रह मानला आहे, काम बिघडणारा ग्रह आहे, क्रूर, मायावी ग्रह आहे, ज्याने समुद्रमंथनाच्या वेळी माया जालाने अमृत प्राशन केले होते. राहू काळात सुरुवात केलेले काम पूर्णत्वाकडे जात नाही, असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. दक्षिण भारतात राहू काळावर खूप जोर दिला जातो, या काळात कुठलेही शुभ काम खास करून कोणतेही पूजन अर्चन किंवा नव्याची सुरुवात, कोणत्याही नवीन कामाची सुरवात म्हणजे नवी घर घ्यायचे असेल, नवीन गाडी असो, नवीन जॉब करायचा असेल अशी कोणतेही कामे आपण राहू काळात करू नये. आपण हा विचार कराल की आजच्या आधुनिक जगात, दीड तासासाठी कोणतेही नवीन काम अडवून ठेऊ का? हे कसे शक्य आहे? नाही आज हे शक्य नाही होत. तरीही याचा विचार आवश्य करावा, अडचण असेल तर मग राहूकाळा मध्ये आपण काय करू शकतो? राहु काळात आपण कोणती कामे सुरू करू शकता? राहुकाळा मध्ये आपण जी कामे करू शकता, ती नैसर्गिक रित्या डीस्ट्रकटीव्ह आहेत, जसे कोणत्या वस्तूची विक्री करणे, आपल्या पासून दूर घालवणे, कुठचा अशा कामाची सुरवात करणे ज्यात तोडफोड असेल, असे सामान काढणे जे नको असलेल काढून टाकणे. कुठलेही सामान आपणास विकायचे असेल, काढायचे असेल, कुठचेही सामान तोडत आहोत, निगेटिव गोष्टींपासुन होत असलेला त्रास नष्ट करण्याची कामे, जी राहुच्या कारक तत्वात येतात, अशी सर्व कामे राहू काळात चांगल्या प्रकारे पूर्ण होतात. असो, ज्यांची राहूची महादशा चालू आहे आणि राहू कुंडलीत अशुभ आहे अशुभ फलित होत असेल. तर त्यांनी या राहू काळात राहू जप मंत्र केल्यास राहू पासून शुभ फळ प्राप्ती होते. अडचणीने आणि नाईलाजाने जर आपल्याला कोणतेही काम सुरू करावे लागत असेल किंवा चुकून झाले असेल, तर आपण त्यासाठी हनुमंताचा जप करावा आणि गूळ, चणा आणि पाणी ग्रहण करावे. ज्योतिषा मध्ये मुहूर्ताला खूप महत्व आहे, शुभ मुहूर्तात केलेले काम सफलता नक्कीच देते. देव पण उचित मुहूर्त नियोजित करूनच अवतार घेतात, प्रभू श्री राम आणि भगवान श्रीकृष्ण अभिजीत मुहूर्तावर प्रकट झाले होते, हा अत्यंत शुभ मुहूर्त असतो. आता राहू मुहूर्ताचा शत्रू आहे, जो शुभ मुहूर्त नष्ट करतो. म्हणूनच राहू काळात कधीही विवाह, मुंज या सारखे सर्वच शुभकार्य वर्ज केले आहेत, राहू काळात जर आपणास नाईलाजाने यात्रा करावीच लागत असेल. तर एक जुना उपाय आवश्य करावा, काही लोक याला अंधश्रद्धा म्हणतील, असे उपाय आपली जुनी माणसे करत होती. पण हे खरोखरच तेवढेच प्रभावशालीही मानले आहेत आणि परंपरागत मिळाले आहेत, जसे राहुकाळात यात्रा करायचीच असेल तर आपल्या घरातील एखादी वस्तु किंवा रुमाल वगैरे बाहेर ठेवा. म्हणजे यात्रा सुरुवात झाली असे होईल, यावर आपण प्रवासासाठी गेला तर राहु कालाचा दोष लागत नाही. अशी मान्यता आहे, तर राहू काळात अश्या प्रकारे दक्षता आवश्य घ्यावी. कोणतेही शुभकार्य करू नये, नवीन कार्य सुरू करू नये, महत्वाची कागदपत्रे आणि व्यवहार करू नयेत…
🌹श्री गुरुदेव दत्त 🌹