नाशिक शहरातील इंदिरानगर हद्दीतील पेरूचीबाग परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या एका जुगार क्लबवर गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ कडून मोठी कारवाई करण्यात आली. पाथर्डी गाव शिवारातील फ्लायिंग कलर्स शाळेसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तीनपत्ती जुगार क्लबवर छापा टाकून तब्बल ₹६०,९०,६२०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या कारवाईत रोख रक्कम, जुगार साहित्य, पाच चारचाकी वाहने, एक रिक्षा, १५ दुचाकी, मोबाइल फोन इत्यादींचा समावेश आहे. या प्रकरणी एकूण २९ आरोपींवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, तसेच सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार अवैध धंद्यांवर कारवाई सुरू आहे. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्र. २ चे अधिकारी व अंमलदार तपास करत असताना पोहवा नंदकुमार नांदुर्डीकर यांना गुप्त बातमीदाराकडून पाथर्डी शिवारातील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली.
ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, मुक्तारखान पठाण, गुलाब सोनार, शंकर काळे, विलास गांगुर्डे, नंदकुमार नांदुर्डीकर आदींच्या पथकाने रात्री ७.४० वाजता छापा टाकला.
छाप्यात वसीम अन्वर शेख (रा. पळसेगाव) व समीर पठाण (रा. वडाळागाव) या दोघांनी मिळून बेकायदेशीरपणे क्लब चालविल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली.
तसेच जुगार खेळणारे खालील इसम घटनास्थळी सापडले: विशाल आहिरे (रा. देवळाली गाव)फारूक शेख (रा. संगमनेर)
अजय पडघान, दीपक मोर्या (रा. अंबड लिंक रोड)गणेश खैरे (रा. नांदुर्डी, निफाड)
सुनील जाधव, भुषण केंदळे, अनिल खरात, भाऊराव धनगर, शेखलाल शेखनुर, जावेद शेख, सागर बुलाखे (सर्व नाशिक व परिसरातील) आहे.
सदर क्लबसाठी जागा उपलब्ध करून देणारा मालक, क्लबमधील पार्टनर व वाहनचालक आदींसह एकूण २९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उप आयुक्त प्रशांत बच्छाव, सहा. आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कार्यवाहीत प्रभारी अधिकारी सपोनि हेमंत तोडकर, सपोनि डॉ. समाधान हिरे, पो.नि. मुक्तारखान पठाण, गुलाब सोनार, शंकर काळे, विलास गांगुर्डे, नंदकुमार नांदुर्डीकर, सुनिल आहेर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, अतुल पाटील, नितीन फुलमाळी, प्रविण वानखेडे, जितेंद्र वजीरे आदींचे मोलाचे योगदान राहिले.