एक देश, एक निवडणूक’ संकल्पनेबाबत राज ठाकरे यांची प्रतिक्रिया: स्थानिक निवडणुका महत्त्वाच्या

Ek desh ek nivdanuk sankalpanebabat Raj thakrenchi pratikriya

केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘एक देश, एक निवडणूक’ संकल्पनेला मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली. राज ठाकरे यांनी यावर विचार व्यक्त करताना काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी विचारले की, जर एखाद्या राज्यात सरकार कोसळले किंवा विधानसभा बरखास्त झाली तर त्या राज्यात आधी निवडणूक होणार का, की लोकसभेच्या कार्यकाळ संपेपर्यंत वाट पाहावी लागेल? तसेच, जर लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या, तर देशातील सर्व निवडणुका पुन्हा घेणार का? असे मुद्दे उचलत त्यांनी या प्रस्तावाच्या अंमलबजावणीविषयी काही महत्त्वाच्या शंकांचे उत्तर अद्याप मिळाले नसल्याचे नमूद केले.राज ठाकरे यांनी यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०२४ मध्ये महाराष्ट्रातील अनेक महापालिका आणि नगरपालिका प्रशासकांच्या अखत्यारीत येऊन ४ वर्षे पूर्ण होतील, पण अद्याप स्थानिक प्रतिनिधी निवडलेले नाहीत. यामुळे सामान्य नागरिकांना आपले प्रश्न मांडण्यासाठी कोणतेही लोकप्रतिनिधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे ‘एक देश, एक निवडणूक’ संकल्पनेवर चर्चा करण्याआधी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्टपणे मांडले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Leave a Reply