आजचे राशीभविष्य

Rashi bhavishya

गुरूवार, 19 सप्टेंबर 2024

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

भाद्रपद कृष्ण द्वितीया.

राहू काळ – दुपारी 1:30 ते 3

आज शुभ दिवस.द्वितीया श्राद्ध.

19* सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर रवी आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचाजन्म चांगल्या आणि श्रीमंत घराण्यात होतो. तुमच्यात एकाग्रता कमी असल्याने शिक्षणात अडथळे येऊ शकतात. मात्र तुम्हाला संशोधन करण्याची आवड असते. तुमचं स्वभाव तापट आणि हेक्त असू शकतो. स्वभाव उतावळा असल्याने प्रेमप्रकरणात अपयश येऊ शकते. तुम्हाला अधिकार आणि प्रतिष्ठा मिळतात. इतरांची लुडबुड तुम्हाला सहन होत नाही. तुम्ही इतरांची परीक्षा उत्तमपणे करू शकतात. मित्र आणि नातेवाईक यांच्या गुप्त गोष्टी तुम्ही बाहेर बोलत नाहीत. तुमचा सल्ला व्यावहारिक असतो. घराकडे फारसा ओढा नसतो. तुमच्या कामात तुम्ही अभयसू असतात. तुमचा स्वभाव धडपड्या, बढाईखोर आणि अति महत्वाकांक्षी असतो. व्यवसायात आणि नोकरीत तुम्हाला उत्तम यश मिळते. इतरांकडून तुम्हाला योग प्रतिसाद मिळत नाही. तुमची अभिरुची अत्यंत उच्च असते. तुम्ही हुशार, बुद्धिमान, शास्त्राची आवड असलेले आहात. तुमची वृत्ती व्यापारी आहे. तुमचा कामाचा झपाटा मोठा असतो. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून क्रीडा प्रकारांची आवड आहे. स्वतःचे विचार तुम्ही मित्रांना उत्तम प्रकारे समजून सांगू शकतात. एखाद्या कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही उत्तम पूर्वनियोजन करतात. तुम्हाला गूढ विद्या आवडतात. तुम्ही एक कलाकार आहात आणि जीवनाच्या सौंदर्याबद्दल तुम्हाला ओढ आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. नीती अनीती आणि परंपरा याच्या कल्पना तुमच्या जरा वेगळ्या असतात. तुम्ही सतत उद्योगप्रिय असतात. तुमच्यामध्ये उत्साह आहे तुम्ही इतरांचा आदर करतात. इतरांच्या गुप्त गोष्टींचा तुम्ही बाहेर उच्चार करत नाहीत. तुमच्याशी सल्लामसलत केल्यास तुमचे मित्र निराशा आणि तणाव यापासून मुक्त राहतात. तुम्ही एक उत्तम सल्लागार आहात. सर्व प्रकारच्या लोकांमध्ये तुम्ही मिसळतात. तुम्ही फारसा सखोल अभ्यास करत नाहीत मात्र वक्तृत्व चांगले असते. तुमच्या संशोधनातून जगाला फायदा होतो. इतरांच्या कल्याणासाठी तुम्ही काम करत असतात. तुमची स्मरणशक्ती चांगली आहे. तुमचे व्यक्तिमत्व दुहेरी आहे. तुम्ही एकाच वेळी व्यवहारी देखील असतात आणि ध्येयवादी सुद्धा असतात. मोठेपणा आणि प्रसिद्धी याची हाव टाळली पाहिजे. शुभ दिवस:- रविवार आणि गुरुवार.

शुभ रंग:- सोनेरी, पिवळा, नारंगी आणि जांभळा.

शुभ रत्न:- पाचू आणि माणिक.(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

मेष:-मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस आहे. वाहन सौख्य लाभेल. पैशाची व्यवस्था होईल.

वृषभ:- मैत्रिणींनो आज छान दिवस आहे. सर्वार्थाने उत्तम लाभ होतील. आज तुमची भिशी लागू शकते.पर्स भरलेली राहील.

मिथुन:- मैत्रिणींनो आज आर्थिक लाभ, मान सन्मान मिळतील. प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या बाबतीत सुखद अनुभव येतील.

कर्क:-मैत्रिणींनो आज छान दिवस आहे. उच्च शिक्षणात यश.धार्मिक कार्यात भाग घ्याल.तीर्थयात्रा घडेल. अनपेक्षित फायदा होईल.

सिंह:-मैत्रिणींनो आज अष्टम स्थानी चंद्र आहे. मेहनत जास्त करावी लागेल.तणाव वाढेल.कामातील अडचणी काहीशा दूर होतील. पती खुश असतील.

कन्या:- मैत्रिणींनो आज उत्तम आर्थिक लाभ होतील. तुफान यश मिळेल. अध्यात्मिक लाभ होतील.वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल.

तुळ:-मैत्रिणींनो आज आर्थिक दृष्टीने चांगला दिवस आहे.कनिष्ठ सहकारी मदत करतील. प्रवासातून लाभ होतील. स्त्री धन वाढेल. संगणक क्षेत्रातील व्यक्तींना अनुकूल ग्रहमान आहे.

वृश्चिक:- मैत्रिणींनो आज मन प्रसन्न राहील, आत्मविश्वास वाढेल .अकल्पित लाभ होतील.संततीचे दूरचे प्रवास संभवतात.

धनु:-मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस आहे. घरगुती धार्मिक कार्यक्रम होतील. बागकामाचा छंद जोपासाल.आई कडून लाभ होईल.

मकर:- मैत्रिणींनो आज आर्थिक लाभ होतील. तुमचा अंदाज अचूक ठरेल. प्रगतीकडे वाटचाल कराल.

कुंभ:- मैत्रिणींनो आज कामकाजात यश. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. बोलण्यातून लाभ होतील.उच्च पदाचा लाभ होईल.

मीन:- मैत्रिणींनो आज तुमच्याच राशीत चन्द्र आहे. लाभ होतील. अंत:त्स्फूर्ती ने चांगले निर्णय घ्याल.आप्त भेटतील. नवीन ओळखी होतील. प्रतिष्ठा वाढेल.

*सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी* नाशिक9272311600 लग्न ,करियर, गुण मीलन विषयी *सशुल्क पत्रिका* पाहण्यासाठी संपर्क करावा.

Leave a Reply