शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024. भाद्रपद कृष्ण तृतीया
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राहू काळ – सकाळी 10:30 ते 12
आज सकाळी 11 वा पर्यंत चांगला दिवस.आज जन्मलेल्या बाळाची विष्टी करणं शांती करून घेणे.
20 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर चंद्र आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या भाग्योदय समुद्र ,नदी, तलाव अशा पाण्याच्या जवळ होतो. विवाह नंतर भाग्योदय होतो. मित्रपरिवार फार मोठा असतो. लेखनाची आवड असते. वैचारिक लेखन करतात. तुमच्या भोवती ढोंगी मित्रमैत्रिणींचे जाळे असते. विरुद्ध लिंगी व्यक्तीमध्ये लोकप्रिय असतात. तुमच्याजवळ चांगली शब्द संपत्ती आहे, त्यामुळे बोलण्यात, लिखाणात ,भाषण देण्यात तुम्हाला यश मिळते. तुमच्या आत्मविश्वास असून दिन दुबळ्या लोकांना मदत करायला आवडते .तुम्ही ध्येयवादी आहात आणि तुमच्या मध्ये प्रचंड कल्पनाशक्ती आहे. तुमचा स्वभाव स्वप्नाळू आहे. इतरांनी तयार केलेल्या आराखड्याचे तुम्ही प्रत्यक्षात रूपांतर करू शकतात. तुमचे विचार स्वतंत्र आहेत. तुम्हाला मानसन्मान मनापासून आवडतात. तुम्ही समाजामध्ये मिसळतात. कोणत्याही गोष्टीतील नावीन्य आणि प्रवासाची तुम्हाला आवड आहे. तुम्ही हुशार आहात आणि शास्त्राची आवड आहे. तुमचा सहवास इतरांना उत्साहवर्धक वाटतो. मित्रांच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला बरे आणि वाईट यातील फरक नीटपणे समजतो. नवनवीन कल्पना आणि भरपूर उत्साह यांचा संगम झाल्याने तुम्ही मोठमोठ्या प्रकल्पात काम करू शकतात. तुम्हाला स्वतःच्या उद्योगात मग्न राहणे आवडते. तुमचा स्वभाव विनम्र असून तुम्ही कायदा प्रेमी आहात. तुम्ही अधिक वयस्कर माणसांकडे आकर्षित होतात. वयाच्या 38 व्या वर्षापासून आर्थिक स्थितीत समाधानकारक बदल होतात उत्कृष्ट गृहिणी असून गृहकृत्यदक्ष असतात. हुशार हरहुन्नरी, कर्तुत्ववान असून पतीशी जुळवून घेता. वैवाहिक जीवनातल्या अडचणींना शांतपणे तोंड देतात. विनोदी स्वभाव व वाक्चातुर्य असल्याने सामाजिक जीवनात यश मिळते .तुम्हाला स्वतःच्या दिसण्याचा ,व्यक्तिमत्त्वाचा, घराचा अभिमान असून तुमच्या वागण्यामुळे इतरांना मत्सर वाटतो. शास्त्रीय दृष्टिकोन असणारे, ज्यांना संशोधन करणे आवडते, निरनिराळ्या विषयांवर चर्चा करण्याची आवड असते असे लोक तुमचे चांगले मित्र होऊ शकतात.
शुभ दिवस : सोमवार,मंगळवार,शुक्रवार
शुभ रंग:- पांढरा, निळा, पिवळा.
शुभ रत्न:- मोती आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
आजचे राशिभविष्य
मेष:-मैत्रिणींनो आज तुमच्याच राशीत असलेल्या चंद्र चा मंगळशी लाभ योग आहे.लक्ष्मी प्राप्त होईल.घरात कुरबुरी होऊ शकतात. आरोग्याचे प्रश्न डोके वर काढतील.
वृषभ:- मैत्रिणींनो आज
व्यय स्थानी चंद्र आहे. शुक्राशी प्रतियुती आहे. प्रेमात फसवणूक होऊ शकते.खर्चिक दिवस. विनाकारण वाद वाढतील.
मिथुन:- मैत्रिणींनो आज झटपट कामाला लागा. वेळ दवडू नका. उत्तम आर्थिक लाभ होतील. मैत्रिणींसोबत आनंदी वेळ जाईल.
कर्क:-मैत्रिणींनो आज मेहनती च्या मानाने यशप्राप्ती कमी होईल. नवीन संधी चालून येतील. हाताची काळजी घ्या.
सिंह:- मैत्रिणींनो आज एखादी छान खबर मिळेल. प्रवास लाभदायक होतील. नैतिक मार्गाने यश मिळेल.
कन्या:- मैत्रिणींनो आज आर्थिक प्रगती चांगली होणार आहे. अचानक लाभ होतील.घरगुती प्रश्न निकाली निघतील.
तुळ:-मैत्रिणींनो आज रोमॅंटिक दिवस. प्रेमात यश लाभेल. पतीसोबत वेळ द्याल. मन प्रसन्न राहील. आर्थिक प्रगती होईल.
वृश्चिक:- मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस आहे. गृह सौख्या चा. वारसा हक्काचे प्रश्न निर्माण होतील. आरोग्य सुधारेल,शत्रूंवर विजय मिळेल.
धनु:-मैत्रिणींनो आज महत्वाचे निर्णय घ्यावेत. शेअर्स मधून लाभ होतील. संततीचे प्रश्न समजून घ्यावे लागतील.
मकर:- मैत्रिणींनो आज घरगुती कामात व्यस्त रहाल. स्वप्ने साकार होतील. नेतृत्व कराल.वाहन सौख्यात कमतरता येईल.
कुंभ:- मैत्रिणींनो आज उद्योग/ व्यवसायात उत्तम प्रगती होईल. कला, साहित्य, संगीत कलेत भरभरून यश मिळेल.आर्थिक भरभराट होईल. स्त्री धन वाढेल.
मीन:- मैत्रिणींनो आज भटकंती होईल,कामकाजात बदल होईल. कला क्षेत्रातून लाभ होतील. नाव व कीर्ती प्राप्त होईल.महिलांकडून सहकार्य लाभेल
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.