आजचे राशीभविष्य

Rashi bhavishya

शुक्रवार, *21 सप्टेंबर 2024*.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

भाद्रपद कृष्ण चतुर्थी

राहू काळ – सकाळी 9 ते 10:30

आज चांगला दिवस आहे” *संकष्टी चतुर्थी* चंद्रोदय मुंबई – 9:03. नाशिक – 8:57.*21*

सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर गुरु आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे.तुम्ही प्रेमळ असून मुलांबद्दल विशेष प्रेम असते. तुमच्या उत्साह दांडगा असून प्रवासाची आवड असते.

तुमच्याकडे लोकांना आकर्षून घेण्याची शक्ती असते .सर्व प्रकारांच्या लोकांमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. वडिलोपार्जित संपत्ती तुम्हाला वाटा मिळतो .तुमच्यात आत्मविश्वास असून इतरांना योग्य सल्ला देता.

आयुष्यात प्रसिद्धी व मानमरातब उशिरा मिळते. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून मान मरातब आणि प्रतिष्ठा या गोष्टींची जपणूक करतात. तुम्हाला शुद्ध प्रेम आणि न्याय आवडतो. तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. स्वतःबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास असतो. तुम्ही धर्माची चिकित्सा डोळसपणे करतात. तुम्ही टापटीप, व्यवस्थित आणि काटेकोर असतात. तुमची बुद्धिमत्ता व्यवहारात उपयोगी पडते. इतरांसाठी तुम्ही कष्ट करतात. तुम्हाला क्रीडा प्रकार आणि गुढविद्या आवडतात तसेच धर्म आणि तत्वज्ञान याची देखील आवड आहे. जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल असून तुम्ही त्याकडे संयमाने बघतात. तुमची उपस्थिती इतरांना आवडते. तुम्ही सावधपणे पावले टाकतात आणि उत्तम सल्लागार असून जीवनातील समस्यांवरती योग्य मार्ग शोधून काढतात.तुम्ही चलाख व आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या आहात. घराबद्दल आपलेपणा असतो, पण ओढ नसते. तुमची इच्छाशक्ती तीव्र असून बुद्धी तल्लख असते .तुमचा स्वभाव हरहुन्नरी असतो परंतु कोणत्याही एका विषयात तुम्ही पारंगत होत नाही .स्वभाव लहरी असून मनाने हळवे असतात. पतीला सर्वतोपरी साथ देता आणि त्याच्या तुम्हाला अभिमान वाटतो .तुम्ही प्रेमळ, निष्ठावान असून उत्तम सह धर्मचारिणी असतात. चाणाक्ष व धूर्त स्वभावामुळे नोकरी धंद्यामध्ये यश मिळते. स्वतःच्या कष्टाचा मोबदला चांगल्या रीतीने मिळवता. पैशामुळे जेवढी सुखी मिळवता येतील त्या सर्वांचा तुम्ही आनंद लुटता.

शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार.

शुभ रंग:- पिवळा, जांभळा आणि हिरवा.

शुभ रत्न:- पुष्कराज, अमेथीस्ट आणि लसण्या.(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

*आजचे राशिभविष्य*

मेष:-मैत्रिणींनो आज मनस्वास्थ्य चांगले राहील. मेजवानी मिळेल. कौटुंबिक वातावरण छान राहील,प्रवास घडतील.

वृषभ:- मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस आहे. घरगुती खरेदी होईल. संतती कडून खुश खबर मिळेल.

मिथुन:- मैत्रिणींनो आज मस्त दिवस आहे. सर्वांना खुश ठेवाल. आनंददायी सहल घडेल.कामात बढती ची शक्यता.

कर्क:-मैत्रिणींनो आज मनासारखी कामे पार पडतील.दूरचे प्रवास घडतील. शिक्षणात मनाजोगत यश मिळेल.कीर्ति, प्रसिद्धी मिळेल.

सिंह:- मैत्रिणींनो आज आर्थिक प्रगतीचा दिवस.कामात नवीन संधी चालून येतील. खुशखबर मिळेल. वेगवेगळ्या कल्पना कामात राबवाल, त्याचा पुढे लाभ मिळेल.

कन्या:- मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. कामाचा तणाव वाढेल. आर्थिक लाभ होतील. मोह टाळा.वारसाहक्काने लाभ होईल.

तुळ:-मैत्रिणींनो आज आर्थिक दृष्टीने संमिश्र दिवस आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. जितकी मेहनत जास्त त्या प्रमाणात लाभ होईल.

वृश्चिक:- मैत्रिणींनो आज सार्वजनिक कामात यश मिळेल. कनिष्ठ व्यक्तीची मदत होईल. स्पर्धा जिंकाल.

धनु:-मैत्रिणींनो आज कामात यश. संततीच्या मनातल्या इच्छा पूर्ण कराल.आर्थिक लाभ होतील. सौख्य लाभेल. गुंतवणूक वाढेल.

मकर:- मैत्रिणींनो आज छान आणि उत्साही दिवस आहे. इच्छा पूर्ण होतील. वाहन सौख्य लाभेल.आईशी हितगूज कराल.

कुंभ:- मैत्रिणींनो आज सुंदर दिवस आहे. भावंडांची साथ मिळेल. आर्थिक लाभ होतील. लेखन,संभाषण,रेडिओ कलेत यश मिळेल. छोटे प्रवास होतील.

मीन:- मैत्रिणींनो आज बचतीचे धोरण स्वीकाराल. प्रवासातून लाभ होतील. मैत्र परिवार सहकार्य करेल.नवीन ओळखी होतील.

*सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी* नाशिक 9272311600 लग्न ,करियर, गुण मीलन विषयी *सशुल्क पत्रिका* पाहण्यासाठी संपर्क करावा.

Leave a Reply