रविवार, *22 सप्टेंबर 2024*
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
भाद्रपद कृष्ण पंचमी
राहू काळ – दुपारी 4.30 ते संध्याकाळी 6″आज (कृत्तिका) वर्ज्य दिवस”
*22* सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर हर्षल आणि बुध ग्रहाचा प्रभाव आहे.तुमची शरीरयष्टी चांगली असून डोळे चांगले असतात. स्वभावात अस्थिरता असते. विरुद्ध लिंगी व्यक्ती पासून फायदा होतो. स्वतःच्या व्यवसायात यश मिळते. मित्रपरिवार अतिशय छोटा असतो भांडण्याची फिकीर करत नाहीत. तुमच्या दिमाख व प्रतिष्ठा असून कर्तुत्वाला लवकरच मान्यता मिळते. आयुष्यातील 40 ते 60 ही वर्ष महत्त्वाचे असून सर्वोच्च यशाचा काळ असतो. जीवनातील पहिला भाग कष्टदायी असला तरी उर्वरित भाग यशाचा व महत्त्वकांक्षा सफलतेचा असतो. काही वेळा तुम्हाला एकटे पण जाणवते. त्यामुळे तुमच्या जीवनात आणि विचारांमध्ये अनेकदा विरोधाभास जाणवतो. तुम्हाला काही विलक्षण घटनांचा जीवनात अनुभव येतो. तुम्ही कोणत्याही परिस्थितीला समर्थपणे तोंड देऊ शकतात. तुमचा कामाचा वेग प्रचंड आहे आणि व्यापारी वृत्ती आहे. तुमची विचारसरणी तर्कशुद्ध आणि शास्त्रीय आहे. उत्साह, प्रगती आणि जोम ही तुमचे वैशिष्ट्ये आहेत. जीवनात अनेक चढउतार अनुभव येतात. कोणत्याही कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही उत्तम नियोजन करतात. मानवतेच्या कल्याणासाठी तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग करतात. तुम्हाला नाविन्य आणि प्रवासाची आवड असते. तुम्हाला जुन्या परंपरा आणि रूढी आवडत नाहीत. जीवनात सतत बदल असावा असा तुमचा विचार असतो. तुमचा मित्र परिवार सतत बदलत असतो. तुम्ही अहंकार आणि हट्टीपणा टाळला पाहिजे आणि डोके शांत ठेवून काम केले पाहिजे. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुमच्या शब्दांमध्ये आणि कृतीमध्ये ठामपणे असतो. तुम्हाला आपल्या घराबद्दल आपलेपणा आहे परंतु ओढा नाही. तुम्ही चला व आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या आहात .घरात व बाहेर दोन्ही ठिकाणी तुम्ही रमता. तुम्हाला अनेक गोष्टीत रस असतो व सर्व गोष्टी व्यवस्थितपणे करण्यात हातखंडा असतो. टापटीप आवडत असली तरी स्वतः फारसे कष्ट करीत नाहीत.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार आणि शनिवार.
शुभ रंग:- तपकिरी, निळा आणि पांढरा.
शुभ रत्न:- हिरा, पोवळे आणि मोती.(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*आजचे राशिभविष्य*
मेष:-मैत्रिणींनो आज छान दिवस आहे. कामे मनाप्रमाणे पार पडतील. संभाषण कौशल्य उठून दिसेल. अनपेक्षित लाभ होतील.आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. धनलाभाचे योग आहेत
वृषभ:- मैत्रिणींनो आज तुमच्या राशीत चंद्र आहे.आत्मविश्वास वाढेल. धडाडी दाखवाल,प्रसिद्धी हगोली, स्तुती होइल. अगदी वेगळा विचार कराल. तुमचा दबदबा राहील.
मिथुन:- मैत्रिणींनो आज व्यय स्थानी चंद्र आहे. काही सुंदर घटना घडतील, आवडत्या वस्तूची खरेदी होईल. काही खर्च अचानकपणे सामोरे येऊ शकतील. मुलांसाठी काही खरेदी कराल. गुंतवणूक करताना योग्य सल्ला घ्या.
कर्क:-मैत्रिणींनो आज लाभात चन्द्र आहे,अत्यंत अनुकूल दिवस आहे. संधीचे सोने करा. वेळ दवडू नका. अनपेक्षित लाभ होतील. अधिकार वाढतील.मैत्रमंडळी किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. घरातही छान वातावरण असेल.
सिंह:-मैत्रिणींनो आज चांगला दिवस आहे. पतीची मर्जी राहील. मोठ्या जबाबदाऱ्या पार पडाल.भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खुश असतील. छान लाभ होतील.
कन्या:- मैत्रिणींनो आज प्रवास घडतील, लक्ष्मीची कृपा राहील. भरघोस यश मिळेल. मेजवानी मिळेल.पती कडून हट्ट पुरवले जातील.
तुळ:-,मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस आहे. रुटीन चालू ठेवा.मनाविरुद्ध घटना घडू शकतात.आर्थिक लाभ होतील मात्र खर्च ही वाढेल. वाहन काळजीपूर्वक चालवा.
वृश्चिक:-मैत्रिणींनो आज तुमचे वर्चस्व राहील.पतीचे सहकार्य मिळेल. उधार देणे टाळा.जुन्या मैत्रिणींशी भेट घडेल. गप्पा रंगतील.
धनु:-मैत्रिणींनो आज उत्तम आर्थिक यश मिळेल. मेजवानी मिळेल. आवडत्या व्यक्ती भेटतील.पाणथळ जागेजवळ भाग्योदय होईल.
मकर:- मैत्रिणींनो आज कलाकर चमकतील. राजकीय क्षेत्रात यश. आनंद देणाऱ्या घटना घडतील. मित्रमैत्रिणींच्या भेटी होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींना धनलाभाचे योग आहेत. मुलांशी सुसंवाद साधा.
कुंभ:- मैत्रिणींनो आज चतुर्थ स्थानी चंद्र आहे. आराम करण्याचा मूड राहील.बाग बगीचा शी संबंध येईन. प्रवास घडतील. समारंभात भाग घ्याल. सामाजिक कार्यातून नावलौकिक मिळेल. वास्तू चे निर्णय होतील.
मीन:- मैत्रिणींनो आज शत्रू पराभूत होतील. कामात नवीन संधी चालून येतील. कलाकारांना यश मिळेल.श्री गणेशाची उपासना करा.
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक मोबाईल – 9272311600. लग्न ,करियर, गुण मीलन विषयी *सशुल्क पत्रिका* पाहण्यासाठी संपर्क करावा.