12* *सप्टेंबर 2024 भाद्रपद शुक्ल नवमी राहू काळ – दुपारी 1:30 ते 3आज चांगला दिवस आहे” *अ:दुःख नवमी, गौरी विसर्जन (रात्री ९.५३ पर्यंत)* दोरे घेणे, भागवत सप्ताह आरंभ.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
12 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर गुरु आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा कल सुखासीन जीवनाकडे असतो. दुसऱ्यातील बारीक-सारीक दोष तुम्ही सहजरित्या काढू शकता .
अधिकार व प्रतिष्ठान तुम्हाला आपोआप मिळतात. तुम्ही दुसऱ्या करता स्वार्थ त्याग करता ,परंतु त्याच्या कारस्थानाला बळी पडतात. तुमच्या फाजील महत्त्वाकांक्षा आहे .जास्त बडबड केलेली तुम्हाला आवडत नाही. तुमच्या शब्दात व कृतीत ठामपणे असतो .विनाकारण काळजी करण्याचा स्वभाव असून काही वेळा मनाने कष्टी होता. विवाह नंतर भाग्योदय होतो. वयाच्या 39 व्या वर्षानंतर स्थिरता मिळू शकते .तुम्ही महत्त्वाकांक्षी असून मान मरातब आणि प्रतिष्ठा या गोष्टींची जपणूक करतात. तुम्हाला शुद्ध प्रेम आणि न्याय आवडतो. तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. स्वतःबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास असतो. तुम्ही धर्माची चिकित्सा डोळसपणे करतात. तुम्ही टापटीप, व्यवस्थित आणि काटेकोर असतात. तुमची बुद्धिमत्ता व्यवहारात उपयोगी पडते. इतरांसाठी तुम्ही कष्ट करतात. तुम्हाला क्रीडा प्रकार आणि गुढविद्या आवडतात तसेच धर्म आणि तत्वज्ञान याची देखील आवड आहे. जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल असून तुम्ही त्याकडे संयमाने बघतात. तुमची उपस्थिती इतरांना आवडते. तुम्ही सावधपणे पावले टाकतात आणि उत्तम सल्लागार असून जीवनातील समस्यांवरती योग्य मार्ग शोधून काढतात.तुम्ही चलाख व आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या आहात. घराबद्दल आपलेपणा असतो, पण ओढ नसते. तुमची इच्छाशक्ती तीव्र असून बुद्धी तल्लख असते .तुमचा स्वभाव हरहुन्नरी असतो परंतु कोणत्याही एका विषयात तुम्ही पारंगत होत नाही .स्वभाव लहरी असून मनाने हळवे असतात. पतीला सर्वतोपरी साथ देता आणि त्याच्या तुम्हाला अभिमान वाटतो .तुम्ही प्रेमळ, निष्ठावान असून उत्तम सह धर्मचारिणी असतात.शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार.शुभ रंग:- पिवळा, जांभळा आणि हिरवा.
शुभ रत्न:– पुष्कराज, अमेथीस्ट आणि लसण्या.(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
आजचे राशीभविष्य
मेष:-मैत्रिणींनो आज वाहन सौख्य लाभेल. दूरचे प्रवास घडतील. नात्यात गैरसमज टाळा. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
वृषभ:- मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस आहे. कटू बोलणे टाळा.खर्च होईल. प्राण्यांच्या पासून धोका संभवतो.
मिथुन:- मैत्रिणींनो आज आर्थिक लाभ होईल. मान सन्मान मिळतील. शत्रू वाढतील. प्रकृती सांभाळा.
कर्क:-मैत्रिणींनो आज आर्थिक लाभ होतील. काही छान बातम्या मिळतील. खर्चात वाढ होईल.
सिंह:- मैत्रिणींनो आज ताण, चिंता दूर होईल. तुमचे वर्चस्व राहील.
कन्या:– मैत्रिणींनो आज उत्तम आर्थिक लाभ होतील. राशीस्वामी बुध चंद्राशी शुभ योग् करत आहे. बौद्धिक क्षेत्रात चमक दिसेल. नवीन खरेदी होईल.
तुळ:-मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस आहे. प्रवासातून लाभ होतील. स्वतःसाठी खर्च कराल.
वृश्चिक:-मैत्रिणींनो आज मन स्थिर राहील. कौटुंबिक कार्याक्रमात सहभागी व्हाल. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत करावी लागेल.
धनु:-मैत्रिणींनो आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. प्रवास कार्यसाधक होतील. विनाकारण शत्रुत्व नको.
मकर:- मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. जबाबदारी वाढेल.कामानिमित्त भटकंती होईल.
कुंभ:- मैत्रिणींनो आज कामकाजात यश . मनातल्या इच्छा पूर्ण होतील.आर्थिक लाभ होतील.शेअर्स मधून लाभ.
मीन:- मैत्रिणींनो आज गुंतवणुकीतून लाभ मिळतील. छोटे प्रवास घडतील. बुद्धिमान वर्तुळात वावर वाढेल.
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी
नाशिक9272311600 लग्न ,करियर, गुण मीलन विषयी *सशुल्क पत्रिका* पाहण्यासाठी संपर्क करावा.