आजचे राशीभविष्य

Januna Ghya ajche Rashi bhavishya

मंगळवार, १७ सप्टेंबर २०२४.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

भाद्रपद शुक्ल चतुर्दशी. शरद ऋतू.

राशिभविष्य

राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० “आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस आहे” *अनंत चतुर्दशी, प्रोष्ठपदी पौर्णिमा* नक्षत्र – शततारका/ पू. भा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ. बाळाची योग आणि विष्टी करण शांती करून घेणे)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) लाभ स्थानी चंद्र आहे. कामे मार्गी लागतील. मन आनंदी राहील. कुटुंबातील शांती सांभाळा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामाचा ताण वाढेल. अधिकारात वाढ होईल. देणी द्यावीच लागतील. कर्जे मंजूर होण्यास विलंब लागेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रवास घडतील. नियोजन बदलेल. कामे पूर्ण होतील. सिद्धी प्राप्त होतील. उच्च शिक्षण लाभेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सांभाळून पावले उचला. जुने येणे वसूल होईल. धन- संपत्ती वाढेल. नवीन करार होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) पत्नीसाठी वेळ द्यावा लागेल. शत्रू पराभूत होतील. भागिदरी व्यवसायातून लाभ होतील. कोर्ट कामात यश मिळेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक लाभ होतील. व्यापार वाढेल. नवीन संधी चालून येतील. वाहन/ मोबाईल दुरुस्ती करावी लागेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) लक्ष्मी प्रसन्न होईल. सिद्धी प्राप्त होतील. छोटे प्रवास घडतील. संशोधन कार्यात यश मिळेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) चतुर्थ चंद्र सामाजिक कामात अडकवून ठेवेल. जमीन व्यवहार होतील. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अर्थकारण मजबूत होईल. व्यापारात वृद्धी होईल. चांगला दिवस आहे. छोटे प्रवास घडतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कौटुंबिक सौख्य लाभेल. नविन खरेदी होईल. देणी द्याल. संततीची नाराजी दूर करावी लागेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मन आनंदी राहील. मेजवानी मिळेल. नातेवाईक येतील. गूढ उलगडतील. संवाद झाल्यास वाद मिटतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र ग्रहमान आहे. व्यय स्थनी मंगळ आणि राहुच्या नक्षत्रात चंद्र आहे. मोठी जोखीम घेऊ नका. विनाकारण अपमानाचे प्रसंग येऊ शकतात.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Leave a Reply