आजचे राशभविष्य महिलांसाठी

aajche rashi bhavishya 21 May 3

मंगळवार, *10* सप्टेंबर 2024.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

भाद्रपद शुक्ल सप्तमी राहू काळ – दुपारी 3 ते 4:30 आज उत्तम दिवस आहे” *गौरी आवाहन (संध्याकाळी ८.०४ पर्यंत)**10* सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर रवी आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही इतरांची परीक्षा उत्तमपणे करू शकतात. मित्र आणि नातेवाईक यांच्या गुप्त गोष्टी तुम्ही बाहेर बोलत नाहीत. तुमचा सल्ला व्यावहारिक असतो. घराकडे फारसा ओढा नसतो. तुमच्या कामात तुम्ही अभ्यासू असता. तुमचा स्वभाव धडपड्या, भांडखोर आणि अति महत्वाकांक्षी असतो. व्यवसायात आणि नोकरीत तुम्हाला उत्तम यश मिळते. इतरांकडून तुम्हाला योग्य प्रतिसाद मिळत नाही. वयाच्या ४६ व्या वर्षी तुमचा उत्कर्ष होतो. तुमची अभिरुची अत्यंत उच्च असते. तुम्ही हुशार, बुद्धिमान, शास्त्राची आवड असलेले आहात. तुमची वृत्ती व्यापारी आहे. तुमचा कामाचा झपाटा मोठा असतो. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून क्रीडा प्रकारांची आवड आहे. स्वतःचे विचार तुम्ही मित्रमैत्रिणी ना उत्तम प्रकारे समजून सांगू शकतात. एखाद्या कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही उत्तम पूर्वनियोजन करतात. तुम्हाला गूढ विद्या आवडतात. तुम्ही एक कलाकार आहात आणि जीवनाच्या सौंदर्याबद्दल तुम्हाला ओढ आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. नीती अनीती आणि परंपरा याच्या कल्पना तुमच्या जरा वेगळ्या असतात. तुम्ही सतत उद्योगप्रिय असतात. तुमच्यामध्ये उत्साह आहे तुम्ही इतरांचा आदर करतात. इतरांच्या गुप्त गोष्टींचा तुम्ही बाहेर उच्चार करत नाहीत. तुमच्याशी सल्लामसलत केल्यास तुमचे मित्र निराशा आणि तणाव यापासून मुक्त राहतात. तुम्ही एक उत्तम सल्लागार आहात. सर्व प्रकारच्या लोकांमध्ये तुम्ही मिसळतात. तुम्ही फारसा सखोल अभ्यास करत नाहीत मात्र वक्तृत्व चांगले असते. तुमच्या संशोधनातून जगाला फायदा होतो. इतरांच्या कल्याणासाठी तुम्ही काम करत असतात. तुमची स्मरणशक्ती चांगली आहे. तुमचे व्यक्तिमत्व दुहेरी आहे. तुम्ही एकाच वेळी व्यवहारी देखील असतात आणि ध्येयवादी सुद्धा असतात. मोठेपणा आणि प्रसिद्धी याची हाव टाळली पाहिजे. तुम्हाला आरामशीर जीवन आवडते. तुम्ही हुशार, हरहुन्नरी, कर्तुत्ववान व पतीशी जुळवून घेणाऱ्या आहात .प्रेमळ आई व निष्ठावान पत्नी आहात. जीवनातल्या कठीण प्रसंगांना तुम्ही शांतपणे तोंड देता. नृत्य व गायन याचे शौकीन असतात. स्वतःच्या चाणाक्ष व धूर्त स्वभावामुळे उद्योग धंदा व्यवस्थितपणे सांभाळू शकतात व कष्टाचा मोबदला चांगला मिळतो .पैशाच्या बाबतीत समृद्ध असता.

शुभ दिवस:- रविवार आणि गुरुवार.शुभ रंग:- सोनेरी, पिवळा, नारंगी आणि जांभळा.शुभ रत्न:- पाचू आणि माणिक.(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

मेष:-मैत्रिणींनो आज अष्टम स्थानी चंद्र आहे. धनप्राप्ती होईल.सासुरवाडी कडून लाभ होईल. मौजमजेवर खर्च कराल.

वृषभ:- मैत्रिणींनो आज चांगला दिवस आहे. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. लॉटरी नशीब अजमावण्यास हरकत नाही, यश मिळू शकते.मिथुन:-मैत्रिणींनो आज आर्थिक लाभ होतील.गृह सजावट होईल. नूतन वस्त्र खरेदी होईल.

कर्क:-मैत्रिणींनो आज प्रवासतुन त्रास संभवतात. अनपेक्षित लाभ होतील. छान बातमी समजेल. दागिने खरेदी होईल.

सिंह:- मैत्रिणींनो आज बौद्धिक कौशल्य दिसेल, नेतृत्व कराल. गायकांना सुसंधी मिळेल. मेजवानी मिळेल. पतीची मर्जी राखा.

कन्या:- मैत्रिणींनो आज आर्थिक आवक वाढेल. धावपळ राहील. भावंडकडून लाभ होतील. मन आनंदी करणारा दिवस आहे.

तुळ:-मैत्रिणींनो आज मन अस्वस्थ राहील. मोठी जोखीम घेऊ नका. बोलण्यातून गैरसमज टाळा.खर्च वाढतील.

वृश्चिक:- मैत्रिणींनो आज मन आनंदी राहील. लक्ष्मी प्राप्ती होइल. वाहन सुख लाभेल.

धनु:-मैत्रिणींनो आज व्यय स्थानी चंद्र आहे. महत्वाची कामे पुढे ढकला. भिन्न लिंगी व्यक्तीकडून लाभ होतील. भ्रमंती होईल.

मकर:- मैत्रिणींनो आज चंद्र लाभात आहे. इच्छा पूर्ण होतील. महत्वाची कामे आज पूर्ण करा.

कुंभ:- मैत्रिणींनो आज धनप्राप्ती होईल. कलाकारांना सुयश मिळेल. कौटुंबिक कामात गुंतून रहाल.

मीन:- मैत्रिणींनो उत्साही दिवस . अर्थप्राप्ती होईल. पती चे सहकार्य मिळेल.प्रियजनांसोबत व्यस्त रहाल.

सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी : नाशिक9272311600 लग्न ,करियर, गुण मीलन विषयी *सशुल्क पत्रिका* पाहण्यासाठी संपर्क करावा.

Leave a Reply