आजचे राशीभविष्य

Rashi bhavishya

शुक्रवार, २७ सप्टेंबर २०२४.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

भाद्रपद कृष्ण दशमी/एकादशी. शरद ऋतू, क्रोधीनाम संवत्सर.

राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००आज दुपारी १.०० नंतर चांगला दिवस आहे. एकादशी श्राद्ध.

चंद्रनक्षत्र – पुष्य. आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क. (विष्टी करण शांती करून घेणे)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल चंद्र – बुध लाभ आणि सूर्य योग प्रगतीची नवीन दारे उघडून देईल. नोकरीत अधिकार वाढतील. सामाजिक वजन वाढेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) नोकरी/ व्यवसायात वृद्धी होईल. नवीन संधी चालून येतील. प्रवास घडतील. शेअर्स यामध्ये यश मिळेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. बौद्धिक जगतात तुमची कीर्ती पसरेल. तांत्रिक बाबतीत यश मिळेल. पशु लाभ होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आत्मविश्वास वाढेल. मेजवानी मिळेल. शत्रू पराभूत होतील. कोर्ट कामात यश मिळेल. लेखक/प्रकाशक याना चांगली बातमी समजेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) व्यय स्थानी चंद्र आहे. तरीही काही सुखद अनुभव येतील. वक्तृत्व गाजेल. इतरांचे प्रतिनिधित्व कराल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. अर्थलाभ होईल. राशीस्वामी प्रसन्न असल्याने व्यवसायात भरघोस यश मिळेल. दबदबा वाढेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नोकरी/व्यवसायात यश मिळेल. व्यवहारात अधिक बारकाईने लक्ष घालावे लागेल. आरोग्याची काळजी घ्या. खरेदी विक्रीतून लाभ होतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) गृहसौख्य लाभेल. सिद्धी प्राप्त होतील. अधिकाराचा फायदा होईल. भ्रमंती घडेल. रवी, बुध अनुकूल आहेत.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. कनिष्ठ सहकाऱ्यांची मदत मिळेल. नवीन खरेदी होईल. मौल्यवान वस्तू सांभाळा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) बोलण्यातून मने जिंकली जातील. नफा वाढेल. आर्थिक तरतूद होईल. कोर्टात यश मिळेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्या षष्ठ स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. व्यापार वाढेल. आरोग्य सांभाळावे लागेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. ग्रहमान तुम्हाला सौख्य प्रदान करेन. शत्रू पराभूत होतील. शेअर्स मधून लाभ होतील.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.)

“ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521

Leave a Reply