Rashibhavishya: आजचा दिवस अनुकूल की प्रतिकूल? जाणून घ्या तुमच्या राशीचा प्रभाव!

राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

गुरूवार, १७ ऑक्टोबर २०२४. अश्विन पौर्णिमा. शरद ऋतू. क्रोधीनाम संवत्सर.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००

“आज चांगला दिवस आहे” कार्तिक स्नान आरंभ

चंद्र नक्षत्र – रेवती/ (दुपारी ४.२० नंतर ) अश्विनी. आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन/ (दुपारी ४.२० नंतर) मेष. विष्टी करण शांती.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) फारशी अनुकूलता नाही. सरकारी कामे अपूर्ण राहतील. विलंब अनुभवाल. धर्म कार्य कराल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सकाळच्या सत्रात कामे पूर्ण करा. धार्मिक यात्रा करण्यासाठी उत्तम कालावधी आहे. संध्याकाळ चिंता वाढवणारी ठरेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. नोकरीतील अनुभवाचा फायदा होईल. नवीन संधी मिळतील. जेष्ठ व्यक्तीची सेवा करा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दूरचे प्रवास होतील. मन आनंदी राहील अडचणी दूर होतील. खर्च मात्र वाढतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र ग्रहमान आहे. सकाळच्या सत्रात प्रतिकुलता आहे. गरजूना मदत करा. दुपारनंतर काहीशी प्रगती साधाल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सकाळच्या सत्रात कामे पूर्ण करा. दुपारनंतर मोठी गुंतवणुक आज टाळा. व्यावसायिक प्रतिस्पर्धी माघार घेतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक प्रगती होईल. अडथळे दूर होतील. व्यावसायिक जागेत बदल संभवतो.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल ग्रहमान आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. जुनी येणी वसूल होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मन उत्साही राहील. मात्र शत्रूत्रास जाणवेल. कोर्टात अपेक्षित यश मिळणार नाही. संयम ठेवावा लागेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. व्यवसाय वाढेल. अर्थकारण मजबूत होईल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. दिवसभरात महत्वाची कामे पूर्ण करा. आर्थिक लाभ होतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) ग्रहमान अनुकूल आहे. वाहन सुख लाभेल. व्यापारात लाभ होतील. छोटे प्रवास घडतील.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521