Rashibhavishya : आजचे अचूक आणि सविस्तर राशीभविष्यगुरूवार, १२ डिसेंम्बर २०२४. मार्गशीर्ष शुक्ल द्वादशी. हेमंत ऋतू. क्रोधीनाम संवत्सर. )
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज उत्तम दिवस आहे” घबाड सकाळी ९.५३ पर्यंत.
चंद्र नक्षत्र – अश्विनी. आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा शनिशी लाभ योग् आहे. तर मंगळाशी केंद्र योग आहे. अनुकूल शनी तुम्हाला नवीन संधी देईन. स्वप्ने पूर्ण होतील. घरगुती वादविवाद टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. प्रलोभने टाळा. व्यसने नकोत. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. नोकरीतील अनुभवाचा फायदा होईल. नवीन संधी मिळतील. प्रवास घडतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दशम चंद्र आहे. कामाचा ताण वाढेल. नोकरीत काही चांगले अनुभव येतील. अधिकाराचा गैरवापर नको.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दूरचे प्रवास होतील. मन आनंदी राहील अडचणी दूर होतील. खर्च मात्र वाढतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र ग्रहमान आहे. काही बाबतीत प्रतिकुलता आहे. गरजूना मदत करा. आरोग्य सांभाळा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आज महत्वाची कामे पूर्ण करा. मोठी गुंतवणुक टाळा. व्यावसायिक प्रतिस्पर्धी माघार घेतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक प्रगती होईल. अडथळे दूर होतील. व्यावसायिक जागेत बदल संभवतो. प्रवासाचे नियोजन बदलेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल ग्रहमान आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. जुनी येणी वसूल होतील. शेअर्स मध्ये यश मिळेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मन उत्साही राहील. मात्र शत्रूचा त्रास जाणवेल. संपत्ती वाढेल मात्र कोर्टात अपेक्षित यश मिळणार नाही.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. व्यवसाय वाढेल. अर्थकारण मजबूत होईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. दिवसभरात महत्वाची कामे पूर्ण करा. आर्थिक लाभ होतील. संततीची काळजी वाटेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या)