आजचे राशीभविष्य

राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

मंगळवार, १ ऑक्टोबर २०२४. भाद्रपद कृष्ण चतुर्दशी. शरद ऋतू.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० “आज वर्ज्य दिवस आहे” *शास्त्रदीहत पितृ श्राद्ध* चतुर्दशी श्राद्ध.नक्षत्र – पूर्वा (फाल्गुना)/ उत्तरा.

आज जन्मलेल्या बाळाची राशी –

सिंह/(दुपारी ४.०२ नंतर) कन्या. (विष्टी करण शांत करून घेणे)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सकाळी गुरू चंद्र केंद्र योग आहे. मोठी गुंतवणूक टाळा. शेअर्स मध्ये जपून निर्णय घ्या. जामीन राहू नका. संध्याकाळ आनंदाची.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामाचा ताण वाढेल. कष्टात वाढ होईल. नवीन/वेगळी कामे करावी लागतील. कमी बोलणे हिताचे आहे. दुपार नंतर अनुकूलता वाढेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रवास घडतील. नियोजन बदलेल. लेखकांना चांगला कलवाढी आहे. सामाजिक कार्यातून चमक दाखवाल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सांभाळून पावले उचला. अनुकूलता नाही. जुने येणे वसूल होईल. दानधर्माचे चांगले फळ मिळेल. दुपार नंतर व्यवसाय वाढेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामात बदल अनुभवाल. मोठी जबाबदारी अंगावर पडू शकते. देणी देऊन टाका. दानधर्म करा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सकाळी अनुकूलता नाही. संयम ठेवावा लागेल. महत्वाची कामे पुढे ढकलावीत. संध्याकाळ आत्मविश्वास वाढवणारी आहे.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दिवसाची सुरुवात चांगली आहे. अडचणी दूर होतील. नवीन मार्ग सापडेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. संध्याकाळ खर्च वाढवणारी.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दशम आणि एकादश स्थानी चंद्र आहे. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. अधिकारात वाढ होईल. चाकोरी बाहेरचे काम करावे लागेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) ग्रहमान अनुकूल आहे. गूढ गोष्टीचे आकर्षण वाटेल. सिद्ध व्यक्तीचा सत्संग घडेल. आरोग्याचे प्रश्न मिटतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अद्यापही ग्रहमान प्रसन्न नाही. दिवसाची सुरुवात अनुकूल नाही. काळजी घ्यावी. दुपारनंतर परिस्थिती बदलेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) दिवसाची सुरुवात चांगली आहे दानधर्म करा. आध्यत्मिक लाभ होतील. प्रलोभने टाळावी लागतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल ग्रहमान आहे. मात्र तरीही मोठी जोखीम घेऊ नका. मर्यादित आर्थिक लाभ होतील. आकर्षणे निर्माण होतील. –

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Leave a Reply