मंगळवार, 17 डिसेंम्बर 2024. मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राहुकाळ – दुपारी 3 ते 4:30
“आज उत्तम दिवस आहे”
17 डिसेंम्बर रोजी जन्मलेल्यांमध्ये वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्यावर शनि आणि गुरू या ग्रहांचा प्रभाव असल्याने तुमच्या विचारांमध्ये अध्यात्माची खोली असते. तुम्ही उत्कृष्ट संघटक व विचारी आहात तुमचे विचार विधायक असतात. तुम्ही शांतता प्रिय असून समाज कल्याणसाठी प्रयत्न करतात. गुढ विद्या, हिप्नॉटिझम याबद्दल तुम्हाला आकर्षण असते .तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी असून धाडसी व गर्विष्ठ असतात. भावनांच्या बाबतीत काहीसे थंड प्रकृतीचे असतात. संशोधन व ज्ञान याकडे ओढ असतो. काही वेळा उदार असतात तर काही वेळा कंजूसपणा दाखवतात ।जोरदारपणे प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट तुम्हाला अशक्य नसेल. स्वतःच्या कल्पनेतून व विचारातून तुम्हाला यश मिळते. कौटुंबिक सुखाचा उपभोग घेणे, त्याचप्रमाणे मुले व नवरा यांच्या महत्त्वकांक्षासाठी त्या करणे तुम्हाला पसंत असते. तुम्ही कर्तबगार असून वागण्यात पद्धतशीरपणा असतो. समाजप्रियतेमुळे घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या बरीच असते .चांगली पत्नी म्हणून तुमचे कौतुक होते. न्यायप्रियता, प्रतिष्ठा, आदरणीय आचार ,धार्मिकता, सहनशीलता है अशा लोकांशी तुमची मैत्री होते. आयुष्यात प्रत्येक बाबतीत विलंब होतो. पैसे मिळवण्यातही अडचणी येतात. कष्टाच्या मानाने यश फार उशिरा मिळते. शिस्त, कर्तव्य, गांभीर्य, मेहनत ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही अत्यंत विचारी आणि समतोल बुद्धीचे आहात. प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते यावर तुमचा ठाम विश्वास असतो. निसर्ग, फुले, सौंदर्य यांचे तुम्हाला उपजत आवड असते. शास्त्रीय संगीत, पुराण, इतिहास हे तुमचे छंद आहेत. तुम्ही सतत कार्यक्षम राहतात. गोरगरिब आणि अपंग बद्दल तुम्हाला सहानुभूती असते. इतरांकडून कसे काम करून घ्यायचे ते तुम्हाला चांगले समजते मात्र तरीही आयुष्यात अनेकदा अडथळे आणि विलंब यांचा अनुभव येतो. गरीब दुबळ्या लोकांबद्दल आपुलकी व आदर दाखवता. इतर लोकांपेक्षा तुम्ही अधिक धोरणी व हुशार असतात .कार्यक्षम कार्यशील व अधिकार गाजवणारे असतात. जेव्हा इतरांना मदतीची गरज असते तेव्हा ते तुमच्याकडे येतात याचे मुख्य कारणे त्यांच्या समस्या व त्यांची दुःखी तुम्ही उत्तम तर्हेने समजू शकता .जीवनात आपण अधिकार गाजवावा याबद्दल ओढ असते. तुमच्या दीर्घोद्याने तुम्ही इतरांना उदाहरण घालून देता. विविध क्षेत्रात योग्य तऱ्हेने व्यवस्थापन करण्यासाठी लागणारा अधिकार ,वचक तुमच्याकडे भरपूर आहे व्यवहारातील सर्व गोष्टी सुलभतेने हाताळण्यात तुम्हाला यश मिळते .पैशाचे नियोजन ही काळजीपूर्वक करता.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.
शुभ रंग:- . राखाडी ,
गडद निळा, जांभळा किंवा काळा
शुभ रत्न- इंद्र नील
(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून पहा)
आजचे राशिभविष्य
मेष:- आज प्रवासातून लाभ होतील.मन आनंदी राहील.
वृषभ:- आज व्यवसायात आर्थिक आवक चांगली होणार आहे. मन प्रसन्न राहील. वाहन चालवताना काळजी घ्या.
मिथुन:- आज छान दिवस आहे. अनपेक्षित लाभ होतील.मनसारख्या गोष्टी घडतील.
कर्क:- आज सकाळची सुरवात संथ राहील. आरोग्यासाठी खर्च करावा लागेल.संध्याकाळ आनंदी.
सिंह:- आज सकाळच्या सत्रात उत्तम आर्थिक लाभ होतील.कामे उरकून घ्या. व्यावसायिकांना यश मिळेल. मित्रमैत्रिणींशी भेटीगाठी होतील, दिवस आनंदात जाईल.
कन्या:- आज व्यवसायासाठी चांगला दिवस आहे. वेळेचा सदुपयोग करा. उत्तरार्ध अधिक लाभाचा आहे.
तुळ:- आज मित्र- मैत्रीणींसोबत मस्त छोटी सहल घडेल. महत्वाची चर्चा होईल. धार्मिक कार्यात मन रमेल.पित्याकडून लाभ होतील.
वृश्चिक:- आज चिंता वाटेल . अनपेक्षित अडचणी कामात उदभवतील. घरगुती कामात व्यस्त रहाल.
धनु:- आज छान दिवस आहे. सरकारी कामे रेंगाळतील. पतीकडून उत्तम लाभाचा आहे.
मकर:- आज उत्साहवर्धक घटना घडतील. कनिष्ठांमार्फत लाभ होतील.
कुंभ:- आज संतती कडून छान बातमी मिळेल.शेअर्स, लॉटरी मार्फत लाभ होतील.
मीन:- आज अनपेक्षित पाहुण्यांचे आदरातिथ्य करावे लागेल.घरगुती कामात व्यस्त रहाल.
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.