बुधवार, 18 डिसेंम्बर 2024. मार्गशीर्ष कृष्ण तृतीया/चतुर्थी.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राहू काळ – दुपारी 12:30 ते 1:30
“तुमचं दैनिक राशीभविष्य आणि ज्योतिष मार्गदर्शन”
“आज 10 नंतर चांगला दिवस आहे. संकष्टी चतुर्थी
चंद्रोदय नासिक:-8:57
पुणे:-8:59
Rashifal today : 18 डिसेंम्बर रोजी जन्मलेल्यांमध्ये वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्यावर मंगळ आणि गुरू या ग्रहांचा प्रभाव असल्याने तुम्ही कणखर, लढाऊ, परिस्थितीला यशस्वी तोंड देणारे, आक्रमक असे आहात. तुम्ही सध्या सभ्य व मोठ्या मनाचे आहात सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या पाडण्यात पार पाडण्यात यश मिळते .गुप्त शत्रूंपासून तुम्हाला त्रास होतो .खोटे आरोप कंड्या पिकवणारे लोक यांपासून तुम्ही सावध राहावे .कोर्टकचेरि करण्याची पाळी आल्यास तुमच्यावर अन्याय होतो. भागीदारांपासून किंवा सहकाऱ्यांपासून काळजी घ्यावी नाहीतर एखाद्या चुकीचा दोष तुमच्यावर लाभला जाईल. इच्छाशक्ती व करारीपणा यांच्या जोरावर कोणत्याही अडचणीवर मात करू शकता. तुम्हाला वडीलो पार्जीत संपत्ती मिळते .तुम्ही हुशार असून योग्य निर्णय घेता .भूतकाळात मिळालेल्या अनुभवामुळे पुढील जीवनात सुधारणा केली जात नाही .तुमची स्मरणशक्ती चांगली असून जुन्या घटना पण तुम्हाला स्पष्टपणे आठवतात. पैशाच्या बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. सर्वसाधारण व्यक्ती पेक्षा जास्त पैसा मिळतो. पैशामुळे उपभोक्ता येतील त्या सर्व सुखांचा तुम्ही आनंद लुटता .कोणताही पराभव तुमच्या जिव्हारी लागतो. एक वेळ तुम्ही मृत्यु पत्करतो म्हणाल पण पराभव पचवू शकणार नाही. तुम्ही शीघ्रकोपी असून धाडसी, पराक्रमी, क्रीडाप्रेमी आणि वादविवादात जिंकणारे आहात. तुमच्यात कधीकधी खोटा अभिमान आणि उद्धटपणा दिसून येतो. इतरांवर टीका करणे आणि विनाकारण वाद घालणे टाळले पाहिजे. तुमच्या लैंगिक भावना तीव्र असतात. आजारी लोकांना स्वतःच्या आंतरिक शक्ती ने बरी करण्याची ताकद तुमच्यात असते. तुम्ही ठाम विचारांचे असून प्राणी आणि मुले तुम्हाला प्रिय आहेत. मित्रांसाठी तुम्ही काहीही करू शकतात. तुम्ही विश्वासु असून कायदा पालन करणे तुम्हाला आवडते. मैत्रिणी किंवा नातेवाईक यांच्याबाबत पैशाची जबाबदारी घेताना सारासार विचार ठेवण्याची जरुरी असते. तुमच्या आवडीनिवडी व बाबत तुम्ही ठाम भूमिका घेतात .तुम्ही तुमची तत्त्वे सोडत नाहीत .महत्वाकांक्षा पुढारीपणा ,धार्मिक वृती मानमरातब, निसर्ग प्रेम हे विशेष गुण तुमच्यात आढळतात. पैशाच्या बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. सर्वसाधारण व्यक्ती पेक्षा जास्त पैसा मिळतो. उच्च श्रेणीचा व्यवसाय किंवा नोकरी मिळण्याची योग्यता असल्यामुळे पैशाची आवक चांगले राहते .तुम्ही महत्त्वाकांशी माणसाची उत्तम पत्नी होऊ शकतात .आपल्या पतीला त्याच्या व्यवसायात मदत करतात .स्वतःचा व्यवसाय करून कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालता. विनोदी स्वभाव व वाकचातुर्य असल्याने सामाजिक जीवनात यशस्वी होता.
"आजचा विशेष: संकष्टी चतुर्थी चंद्र उदय वेळा"
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ अंक:- 3, 6, 9.
शुभ रंग:- तांबडा.
आजचे राशिभविष्य
मेष:- आज वाहन चालवताना काळजी घ्या.महिला सहकारी मदत करणार नाही.अति संवेदनशील वृत्तीचा त्रास होईल.
वृषभ:- आज कलाकार चमकतील.कलाकौशल्य दिसून येईल.आर्थिक दृष्टीने छान.छोटे प्रवास घडतील.
मिथुन:- आज कामात यश मिळेल मात्र मोबदला मिळायला उशीर होईल.कौटुंबिक सुख मिळेल. स्त्रीच्या मार्फत लाभ होतील.
कर्क:- आज छान दिवस.तुमच्याच राशीत चन्द्र आहे.उत्साहित आणि आनंदी रहाल.नातेवाईकांशी भेटीगाठी होतील.प्रवास घडेल.
सिंह:- आज व्यय स्थानी चंद्र आहे. आत्मविश्वास कमी असेल. वादविवाद टाळा. अविचारी पाऊल उचलू नका.
कन्या:- आज लाभ स्थानी चन्द्र आहे.उत्तम आर्थिक उत्पन्न वाढेल.विवाह इच्छुकांना अपेक्षित बातमी मिळेल. निसर्गाच्या सानिध्यात पर्यटन घडेल.मैत्रिणी च्या मार्फत लाभ होतील.
तुळ:- आज उत्तम आर्थिक लाभ होतील.कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल.बढती मिळण्याची शक्यता.
वृश्चिक:- आज प्रवासातून त्रास होईल.भाग्य साथ देणार नाही.संतति ची काळजी वाटेल.
धनु:- आज अष्टमात चन्द्र आहे.खर्च वाढतील. विनाकारण धावपळीत दिवस जाईल. आरोग्याची काळजी घ्या.वाहन चालवताना काळजी घ्या.
मकर:- आज दिवस आनंदी आणि उत्साही राहील.मैत्रमैत्रीणी समवेत सहलीचा आनंद लुटाल.वैवाहिक सुख लाभेल.व्यवसाय विस्तार कराल.
कुंभ:- आज शत्रूचा पराभव होईल. नोकरीत सहकार्य मिळेल.कौटुंबिक वातावरण छान राहील.
मीन:- आज छान दिवस आहे. कल्पनासृष्टीत रमाल. विद्यार्थ्यांना यश. मुलांकडे लक्ष द्यावे लागेल.
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.