नाशिक: श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडाच्या घाट रस्त्यावर दरड प्रतिबंधकउपाययोजनांसाठी प्रशासनाने २५ नोव्हेंबर ते ९ जानेवारी २०२५ या कालावधीत ठरावीक वेळेत वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अकुनुरी नरेश यांनी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
वेळापत्रक
दरड प्रतिबंधक उपायांसाठी सकाळी ६ ते दुपारी ११.३० या वेळेत रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.तथापि, मंगळवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, तसेच २४ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत वाहतूक सुरळीत चालू राहील.
वाहतूक बंदच्या ठराविक तारीखा:
२५, २७, २८ नोव्हेंबर०२, ०४, ०५, ०९, ११, १२, १६, १८, १९, २३ डिसेंबर
०६, ०८, ०९ जानेवारी २०२५
सप्तशृंगीगड ते नांदुरी रस्त्यावर दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता सैल खडक व दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याशिवाय, जाळी व बॅरिअर बसविण्याचे कामही प्रगतीपथावर आहे.
भाविक व स्थानिकांसाठी दिलासा:
गडावर मंगळवार, शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी लक्षात घेता या दिवशी रस्ता पूर्णतः खुला ठेवण्यात येईल. तसेच नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर २४ डिसेंबर ते ५ जानेवारीदरम्यान सलग १२ दिवस वाहतूक सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे व्यापारी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
रस्त्यावर पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय आवश्यक ठरल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.