सातारा : साताऱ्यात 007 नंबरची गाडी म्हटली की सर्वप्रथम आठवण येते ती खासदार उदयनराजे भोसले यांची. त्यांच्या या खास गाडीचा क्रमांक साताऱ्यात खूप प्रसिद्ध आहे. मात्र, आज या गाडीचा क्रमांक ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जोडला गेला, ज्यामुळे सर्वत्र चर्चा रंगली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
शरद पवार जेव्हा जेव्हा साताऱ्यात येतात, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी खास गाडीची व्यवस्था करण्यात येते. आज मात्र त्यांच्यासाठी 007 क्रमांकाची गाडी कराड येथून खास बोलावण्यात आली होती. शरद पवार यांचा हा दौरा साताऱ्यात महत्त्वाचा मानला जात असताना, त्यांनी दिवसभर या गाडीतून जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रवास केला.