
सातपुर, १० सप्टेंबर २०२४ – सातपुरच्या राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सवाचे आगमण सोहळे भव्य दिमाखात साजरे केले. शुक्रवारी सायंकाळी, सातपूर कॉलनीत शेषनागावर भगवान विष्णूच्या रूपात गणेशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ढोल वादकांच्या कलात्मक सादरीकरणाने वातावरण मंत्रमुग्ध झाले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
सातपुरच्या राजा गणेशोत्सव मंडळाने नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं मागील वर्षीच्या उत्सवासाठी प्रथम बक्षीस मिळवले असून, यंदा मंडळाच्या उत्साहात द्विगुणित झाला आहे. मिरवणुकीत आकर्षक रोषणाई असलेल्या वाहनातील डिजेच्या गाण्यांच्या तालावर असंख्य तरुणांनी ठेका धरला, तर ग्रामीण बाजातील संबळ वादनावर लहान मोठ्यांनी आनंद व्यक्त केला.
शिवनेरी चौकातील गणेश आरती सोहळ्यात महिला पोलिस अधिकारी जया तारडे यांच्या हस्ते गणेशाची आरती संपन्न झाली. यावेळी माजी नगरसेविका उषा शेळके यांनी जया तारडे यांचा यथोचित सत्कार केला. जया तारडे यांनी महिला सुरक्षा विषयावर मार्गदर्शन केले, तर उषाताई शेळके यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
राजा गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ खताळे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी विविध सामाजिक, लोकोपयोगी देखावे सादर केले जातात. यावर्षी, मंडळाने भव्य शेषनागावर भगवान विष्णूच्या रूपातील गणेशाचा आकर्षक देखावा सादर केला. रविवारी सकाळी, मंडळाच्या चेतन खैरनार यांच्या सहपत्नी आरती करण्यात आली.
तसेच, मंडळाच्या वतीनं रंग भरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, ज्यात परिसरातील बच्चे कंपनीने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. कॅनरा बँकेचे अधिकारी राजेश जयस्वाल आणि निहारिका अहिरे, पी एल ग्रुप गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष पवार यांनी मंडळाला भेट देऊन गणेश पूजन केले आणि प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. यावेळी सायंकाळी जेष्ठ नागरिकांच्या हस्ते आरती करण्यात आली आणि राष्ट्रीय कीर्तनकार उदयराज दीनानाथ गंधे महाराज यांचे कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
या उत्सवात दाही दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे यांनी या विविध उपक्रमांची माहिती दिली.