नाशिक मध्ये पहिल्यांदाच प्रमाणित उपचार तंत्रांनी फक्त २ दिवसात तुमच्या मनाला आणि शरीराला नवचैतन्य द्या
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
योगशक्तीधारक सद्गुरू आचार्य उपेंद्र यांच्या अंतर योग सायन्स ऑफ हिलिंग या दोन दिवसीय शिबिराचे दि. २८ व २९ रोजी कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा हॉल येथे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसांच्या या सत्रात पहिल्या दिवशी म्हणजे २८ सप्टेंबरला सकाळी ७ ते ९ या वेळेत पूर्व चाचण्या होतील. दुपारी २ ते सायंकाळी ८ पर्यंत समस्यांचे निराकरण करणारे ज्ञान सत्र होईल. रविवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत साधना आणि नंतर पुन्हा वैद्यकीय चाचण्या असा क्रम आहे. शिबिरात रक्तदाब, मधुमेह, तणाव, सांदेदूखी, मणक्यांचे विकार, किडनी स्टोन, अस्थमा, थायरॉईड, सायनस अशा अनेक आजारांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आचार्य उपेंद्र जी २००५ पासून आपल्या भारत देशाला विश्वगुरू बनविण्यासाठी अविरतपणे कार्यरत आहेत. आचार्य जी गणेश विद्या, श्री विद्या, संकल्प सिध्दी, पितृऋण मुक्ती, दुर्गासप्तशती इत्यादी शिबिरांच्या माध्यमातून दुर्मिळ ज्ञान व दुर्लभ साधना देत, लाखो साधकांना जीवनातील विघ्ने दूर करण्याचा मार्ग दाखवत आहेत. अंतर योगचे वैशिष्ट्य म्हणजे इथे येणारे साधक आध्यात्मिक उन्नतीबरोबर भौतिक प्रगतीही साधतात.