Sharad Pawar : शरद पवार यांना प्रेस कामगारांकडून ऐतिहासिक भेट

शरद पवार यांना प्रेस कामगारांकडून ऐतिहासिक स्मृतिचिन्ह

नाशिकरोड: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष, माजी संरक्षण मंत्री व राज्यसभेचे खासदार शरद पवार Sharad Pawar यांचा 12 डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा होणार आहे. या विशेष दिनाचे औचित्य साधून इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाच्या वतीने शरद पवार Sharad Pawar यांना ऐतिहासिक आणि अनोखी भेट देण्यात येणार आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

1000262715

प्रेस मजदूर संघाच्या वतीने पवार यांना त्यांच्या जन्माच्या वेळी चलनात असलेली इंग्रजकालीन ऐतिहासिक नाणी तसेच पवार यांची प्रतिमा असलेली 85 आकड्यांची नाणी भेट स्वरूपात दिली जाणार आहे. या भेटीचे आयोजन संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.

शरद पवार Sharad Pawar आणि प्रेस कामगारांचे खास नाते शरद पवार यांचे इंडिया सिक्युरिटी प्रेसमधील कामगारांसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. प्रेस कामगारांच्या विविध उपक्रमांमध्ये पवार नेहमीच सहभागी होतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांच्या खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्यामुळे पवार आणि गोडसे यांच्यातील घनिष्ठ नाते विशेष चर्चेत आहे.

1000262717

इंग्रजकालीन नाण्यांचे ऐतिहासिक महत्त्व
शरद पवार यांना भेट दिली जाणारी नाणी त्यांच्या जन्मकाळातील चलनाचा भाग आहेत. या नाण्यांचे ऐतिहासिक महत्त्व मोठे असून त्यांचे संग्रहित मूल्य अनमोल मानले जाते. या भेटीद्वारे कामगारांनी पवार यांना त्यांच्या जीवनातील एक आठवणीय आणि ऐतिहासिक भेट देण्याचा प्रयत्न केला आहे.

1000262713