दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
शिवशक्ती मित्र मंडळ श्रीराम कथा संपन्न ह भ प गणेश महाराज कुदळे
शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बालमटाकळी येथे १७ सप्टेंबर: रोजी प्रसिद्ध बजरंग गणेश मित्र मंडळ बालअंबिका नगर , शिवशक्ती मित्र मंडळ आयोजित भव्य श्रीराम कथा चे पाच दिवसाचे आयोजन केले होते कथा प्रवक्ते रामायणाचार्य ह भ प गणेश महाराज कुदळे यांनी आपल्या मधुर वाणीतून श्रीराम कथा चे महत्व सांगितले. या कथेला शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रताप काका ढाकणे यांनी उपस्थिती दर्शवली. या दोन्ही मंडळांनी आपला सामाजिक वारसा जपत आणि पर्यावरणपूरकतेची जाणीव ठेवत गणपती विसर्जन मिरवणुकीचा समारोप मोठ्या उत्साहात पार पाडला. गेल्या अनेक वर्षांप्रमाणे, या दोन्ही मंडळांनी यंदाही विसर्जन मिरवणुकीत अनुकरणीय शिस्त व स्वच्छतेचा आदर्श दाखवला. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडू मातीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करून मंडळांनी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली. या वर्षी विशेष म्हणजे, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, आणि स्वच्छतेच्या दृष्टीने मोठी भूमिका निभावली. गणेशभक्तांनीही संयमाने शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होत या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. बालमटाकळी येथील प्रमुख गणपती मंडळांपैकी असलेल्या बजरंग गणेश मित्र मंडळ बालंबिका नगर , शिवशक्ती मित्र मंडळांनी सामाजिक एकता आणि पर्यावरण पूरकतेच्या महत्त्वावर भर देत हा उत्सव साजरा केला. या गणपती विसर्जनाच्या वेळेस दोन्ही मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य गावातील महिला उपस्थित होते.
पांडुरंगा निंबाळकर
अहमदनगर शेवगाव