Massive Shiv Sena Determination Camp : निर्धार शिबिरास शिवसेना पदाधिकाऱ्यांची आवर्जून उपस्थिती अपेक्षित – दत्ता गायकवाड यांचे आवाहन

images 14

१६ एप्रिल रोजी नाशिकमध्ये शिवसेनेचे भव्य निर्धार शिबिर

Shiv Sena Determination Camp | येत्या बुधवारी, १६ एप्रिल २०२५ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नाशिक येथे निर्धार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील शिवसेनेची बैठक शासकीय विश्रामगृह, दिंडोरी येथे पार पडली. या बैठकीला शिवसेना सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डि. जी. सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन

या शिबिराचे उद्घाटन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत तसेच इतर मान्यवर नेते मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचा समारोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावी भाषणाने होणार आहे.

पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शिबिरास उपस्थित राहावे – दत्ता गायकवाड

या बैठकीत दत्ता गायकवाड यांनी सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी व युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले की त्यांनी निर्धार शिबिरात उपस्थित राहून पक्षाच्या धोरणांना पाठबळ द्यावे.

या बैठकीस मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यामुळे शिबिराच्या आयोजनास उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Shiv Sena Determination Camp