नाशिक – तरुण ऐक्य मंडळ संचालित श्रीराम विद्यालय व कनिष्ठ महाविदयालय पंचवटी नाशिक या शाळेत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पाची सातव्या दिवशी विसर्जन मिरवणूक लेझीमच्या तालावर हलगीच्या ठेक्यावर व विविध प्रात्यक्षिके सादर करुण गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. या वेळी लेझीम पथकात 170 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व पंचवटीकरांची मने जिंकली या प्रसंगी संस्थेचे
अध्यक्ष श्री बी. के. मुखेडकर सर, सचिव श्री डी. के. मुखेडकर सर,मा. धोत्रे सर व संस्थेचे सर्व पदाधिकारी श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य श्री. नवसारे सर उप प्राचार्य श्री. आटवणे सर, पर्यवेक्षक श्री सुरसे व श्री जोपळे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.