सिंहस्थ कुंभमेळा 2027 : नाशिकसाठी 9 नवीन रस्ते, 4000 कोटींचा प्रकल्प मंजूर

Simhastha Kumbh Mela 2027: 9 new roads for Nashik, project worth Rs 4000 crore approved

नाशिक :
2027 मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा पूर्वी वाहतूक आणि पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने जोरदार तयारी सुरू केली आहे. नागपूरमध्ये पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत 9 नवीन रस्त्यांच्या विकासासाठी 4000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

बैठकीत कोण होते उपस्थित?

या बैठकीचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भूषवले. यामध्ये गिरीश महाजन (कुंभ प्रभारी मंत्री), चंद्रशेखर बावनकुळे (राज्य भाजपा अध्यक्ष), तसेच विविध खात्यांचे मंत्री, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होते.

कोणते 9 मार्ग विकसित होणार?

  1. घोटी – पहिणे – त्र्यंबकेश्वर – जव्हार फाटा
  2. द्वारका सर्कल – सिन्नर IC 21 (समृद्धी महामार्ग) – नांदूर शिंगोटे – कोल्हार
  3. नाशिक – कसारा मार्ग
  4. सावली विहीर IC 20 – शिर्डी – शनी शिंगणापूर फाटा (राहुरी खुर्द)
  5. नाशिक – धुळे मार्ग
  6. त्र्यंबकेश्वर – जव्हार – मनोर मार्ग
  7. शॅडो विहीर – मनमाड – मालेगाव
  8. घोटी – सिन्नर – वावी – शिर्डी
  9. शनी शिंगणापूर फाटा – अहिल्यानगर (खरवंडी फाटा)

रिंगरोड आणि सहापदरी रस्त्यांचाही समावेश

या बैठकीत नाशिक रिंगरोडला मंजुरी देण्यात आली. तसेच नाशिक ते त्र्यंबकेश्वर मार्ग सहापदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हा रस्ता काही ठिकाणी चार लेन, तर काही ठिकाणी सहा लेन असणार असून, पहिल्या टप्प्यातील काम कुंभपूर्वी पूर्ण केले जाणार आहे.

धार्मिक पर्व + विकासाचा महामार्ग

कुंभमेळा हे महाराष्ट्राचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्व आहे. या निमित्ताने रस्त्यांची घडी बसवणाऱ्या या योजनेमुळे:

  • भाविकांसाठी प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार
  • पर्यटनाला चालना
  • स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ

मुख्यमंत्री म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते नेटवर्कचा झपाट्याने विकास होतोय. नाशिकसाठी हे पाऊल केवळ कुंभापुरते मर्यादित नसून, हा भविष्यातील विकासाचा पाया ठरणार आहे.”