Simhastha Kumbh Mela Nashik 2027 | कुंभमेळा आयुक्तपदी करिष्मा नायर यांची नियुक्ती

mbcMarathi

Nashik Kumbh Mela Update | 2027 मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा नाशिक 2027 साठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत स्वतंत्र सिंहस्थ प्राधिकरणाची स्थापना केली आहे. प्रयागराजच्या धर्तीवर प्रथमच ‘कुंभमेळा आयुक्त’ पद निर्माण करण्यात आले असून, या महत्त्वाच्या पदावर अतिरीक्त आयुक्त करिष्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Simhastha Kumbh Mela Nashik 2027

या निर्णयामुळे आगामी कुंभमेळ्याच्या प्रशासकीय तयारीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

प्रशासकीय यंत्रणा सज्ज : २४ हजार कोटींचा सिंहस्थ आराखडा

सिंहस्थ 2027 साठी नाशिक महापालिका आणि इतर विभागांनी मिळून सुमारे ₹24,000 कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यात महापालिकेचा वाटा ₹15,000 कोटी तर इतर विभागांचा ₹9,000 कोटी इतका आहे. यापैकी ₹2,000 कोटींच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, शासनाच्या अंतिम मंजुरीसाठी प्रतीक्षा सुरू आहे.

स्वतंत्र सिंहस्थ प्राधिकरणची रचना व जबाबदाऱ्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रविण गेडाम (विभागीय आयुक्त) यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभ प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. विविध विभागांतील योजनांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी कुंभमेळा आयुक्त करिष्मा नायर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

सिंहस्थ प्राधिकरणात कोण कोण आहेत?

22 सदस्यीय सिंहस्थ प्राधिकरणात पुढील पदाधिकारी आणि अधिकारी समाविष्ट आहेत:

  • विभागीय आयुक्त (अध्यक्ष)
  • जिल्हाधिकारी नाशिक
  • विशेष पोलिस महानिरीक्षक (उपाध्यक्ष)
  • नाशिक महापालिका आयुक्त
  • त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी
  • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ
  • जलसंपदा, महावितरण, जीवन प्राधिकरणाचे अभियंते
  • आरोग्य उपसंचालक, नगररचना सहसंचालक
  • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
  • रेल्वे मंडळ प्रतिनिधी
  • आणि नवीन नेमलेले कुंभमेळा आयुक्त करिष्मा नायर