Simhastha Kumbh Mela – Demand for 30-Meter Expansion of Pathardi-Gaulane Road
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Simhastha Kumbh Mela) येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी आणि शहराचा विकास अधिक व्यापक प्रमाणात व्हावा, यासाठी पाथर्डी ते गौळाणे रस्ता १८ मीटर ऐवजी ३० मीटर करण्याची मागणी करण्यात आली आहे. माजी स्थायी समिती सभापती मामा ठाकरे यांनी यासंदर्भात नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांना निवेदन दिले.
या निवेदनात, कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील गर्दीची सोय करण्यासाठी आणि शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या फाळके स्मारक व बुद्ध विहाराच्या सुशोभीकरणाची मागणी करण्यात आली आहे. फाळके स्मारक हे नाशिकच्या प्रवेशद्वाराजवळ असून, ते पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे त्याचे अधिक चांगल्या प्रकारे संवर्धन आणि सौंदर्यीकरण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
शासनाच्या वतीने नाशिक कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, हे अधोरेखित करत, मामा ठाकरे यांनी विभागीय आयुक्तांकडे रस्त्याचा विस्तार व पर्यटनस्थळांचे सुशोभीकरण तातडीने हाती घेण्याची विनंती केली आहे यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी भोर उपस्थित होते
या मागणीमुळे सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या लाखो भाविकांसाठी सुविधा निर्माण होतील तसेच नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.