“सिन्नर आयटीआयचा कौशल्यविकासासाठी पुढाकार; ४० उद्योगांसोबत सामंजस्य करार”

Sinnar ITI's agreement with forty companies

सिन्नर, येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने (आयटीआय) प्रशिक्षणार्थींना दर्जेदार ऑन जॉब ट्रेनिंग (ओजेटी) मिळावे म्हणून चाळीस औद्योगिक आस्थापनांशी सामंजस्य करार केला आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत उद्या ( ता. ५) याबाबत औपचारिकता पूर्ण करण्यात येत आहे. यावेळी सिन्नर आयटीआयमध्ये ‘शिटमेटल ट्रेड थेअरी’ या पुस्तकाचे प्रकाशनही सूर्यवंशी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती गटनदेशक राजेंद्र महाजन यांनी दिली.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

याबाबत अधिक माहिती अशी की, आयटीआय सिन्नर, सिमेन्स, टाटा स्ट्राइव्ह आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, नाशिक यांनी संयुक्तपणे प्रयत्न करून कौशल्य विकासासाठी पाऊल टाकले आहे. आयटीआयमध्ये शिकत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष कारखान्यातला कार्यानुभव होण्यासाठी संबंधित आस्थापनांशी करार करण्यात आला आहे. यामुळे प्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारून औद्योगिक विकासाला हातभार लागेल. त्याचप्रमाणे कारखाने आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यामधील “स्किल गॅप” भरून निघण्यास मदत होईल.
कार्यक्रमासाठी सहसंचालक अनिल गावित, प्राचार्य….., आदि उपस्थित राहणार आहेत.