नाशिक, प्रतिनिधी – प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन, रेल्वे प्रशासनाने दादर आणि भुसावळ दरम्यान १०४ विशेष गाड्यांची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी होण्यास मदत होईल. या विशेष गाड्यांची सेवा १ ऑक्टोबर ते ३० डिसेंबर या कालावधीत चालवण्यात येईल.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
दादर-भुसावळ-दादर त्रि-साप्ताहिक विशेष (गाडी क्र. 09051) सोमवार, बुधवार आणि शनिवार या दिवशी चालेल. ही सेवा १ ऑक्टोबर ते ३० डिसेंबर या दरम्यान चालणार असून, एकूण ३९ फेऱ्या होणार आहेत. यासोबतच गाडी क्र. 09052 त्रि-साप्ताहिक विशेष देखील सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावेल.
याशिवाय, दादर-भुसावळ साप्ताहिक विशेष गाडी (गाडी क्र. 09049) ४ ऑक्टोबर ते २७ डिसेंबर या दरम्यान दर शुक्रवारी धावणार आहे, ज्याची एकूण १३ फेऱ्या होतील. गाडी क्र. 09050 साप्ताहिक विशेष देखील याच कालावधीत दर शुक्रवारी चालवण्यात येईल.
या गाड्यांच्या वेळापत्रक, थांबे, आणि संरचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. प्रवाशांना www.irctc.co.in किंवा सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर विशेष शुल्कासह या गाड्यांचे तिकीट बुक करता येईल.
विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या वेळांसाठी www.enquiry.indianrail.gov.in किंवा एनटीईएस अॅपचा वापर करून तपशीलवार माहिती मिळवता येईल, असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.