एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे

eknath shinde ST

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे .. ही मुख्य मागणी असून याबरोबरच आर्थिक बाबी, खाजगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मान्य करावेत.. असा इशारा देत एसटी कर्मचारी संघटनेने आज पासून ते मुदत संप पुकारला आहे. एन एन गणेशोत्सव काळात लाल परीचा ब्रेक लागल्याने सामान्यांचे हाल झाले आहेत..

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राज्य मार्ग परिवहन महामंडळ च्या आजी-माजी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती स्थापना केली असून एसटीच्या सर्व कामगार संघटना, कृती समिती यांच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. या समितीने राज्यभरात बैठकांचे सत्र घेऊन 3 सप्टेंबरला आंदोलन करण्याचा निर्धार कृती समितीच्या माध्यमातून केला आहे..

यावेळी नाशिक विभागीय संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी योगेश लिंगायत (प्रात्यक्षिक सचिव, कामगार संघटना), स्वप्निल गडकरी ( विभागीय सचिव कामगार संघटना), भूषण परशेरे ( विभागीय कार्याध्यक्ष, कामगार संघटना), राकेश भंडारी (QRT सदस्य), राजेंद्र पालखेड (कामगार नेता), शशिकांत ठेवले (विभागीय कास्ट्राईप संघटना),
सुधीर खोब्रागडे ( विभागीय सचिव कास्ट्राईप संघटना) यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली

Leave a Reply